सोलापूरक्राईममहाराष्ट्रराजकीयसामाजिक

गुन्ह्यात अटक न करण्यासाठी पोलीस हवालदाराने स्विकारली लाच, गुन्हा दाखल

सोलापूर : प्रतिनिधी

दाखल गुन्ह्यात अटक न करता, फक्त चॅप्टर केस करुन सोडून देण्यासाठी खाजगी इसम रोहित नागेश गवड यांच्याकरवी तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी पोलीस हवालदार किरण देविदास म्हेत्रे व खाजगी इसम रोहित गवड यांना बुधवारी ताब्यात घेण्यात आलंय. उभयतांविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

याप्रकरणी मिळालेली अधिक माहिती अशी की, या प्रकरणातील तक्रारदार व त्याच्या मामे भावाविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात कलम ३२५ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे सांगून त्या गुन्ह्यात अटक न करता चॅप्टर केस करून सोडून देण्यासाठी पोलीस हवालदार किरण म्हेत्रे, बक्कल नं.४२३, नेमणूक – विजापूर नाका पोलीस ठाणे यांनी खाजगी इसम रोहित नागेश गवड यांच्याकरिता २५ हजार रुपये लाचेची मागणी केली.

यासंबंधी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर कार्यालयाकडे तक्रार दाखल केल्यावर, २४ जून रोजी त्या तक्रारीवर पडताळणी झाली. मंगळवारी, २५ व २६ जून रोजी रचलेल्या साखळ्यात तडजोडीअंती पोलीस हवालदार किरण मेहत्रे यांच्याकडून ठरलेली १० हजार रूपयांची लाच स्वीकारताना खाजगी इसम नागेश गवड, वय. ३३ वर्षे रा.३०४, दक्षिण कसबा सोलापूर याला रंगेहात पकडण्यात आलं. दोन्ही आरोपीस ताब्यात घेऊन जेलरोड पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे गुन्हा नोंद करण्यात आलाय.

याप्रकरणी पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे/खराडे (लाप्रवि, पुणे) यांनी मार्गदर्शन अधिकारी म्हणून मार्गदर्शन केले.

ही कामगिरी पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार, पोलीस निरीक्षक उमांकांत महाडिक, पोलीस अंमलदार पोह/शिरीषकुमार सोनवणे, पोहवा/श्रीराम घुगे, पोह/अतुल घाडगे पोशि/रवि हाटखिळे, चालक पोह/राहुल गायकवाड (सर्व नेमणुक : अॅन्टी करप्शन ब्युरो सोलापूर) यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!