सेवानिवृत्त पोलीस हवालदार राजकुमार श्रीमान यांना बडतर्फ कालावधीतील सर्व देयक रकमा देण्याचे (मॅट) न्यायालयाचे आदेश

सोलापूर : प्रतिनिधी
तत्कालीन पोलीस आयुक्तांनी शासकीय सेवेतून बडतर्फ केल्याच्या आदेशा विरोधात मॅट कोर्टाने दिलासा देत 21 महीने 15 दिवसांचा सेवाबाह्य कालावधी हा कर्तव्य काळ म्हणून निश्चित करून थकीत देय रकमा देण्याचा आदेश दिला आहे.
तत्कालीन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी 16 सप्टेंबर 2020 रोजी 311(2) ब नुसार पोलीस सेवेतून बडतर्फ करण्याचा काढलेल्या आदेशा विरुद्ध पोलीस हवालदार 231 राजकुमार बाबुराव श्रीमान यांनी या आदेश विरोधात मॅट कोर्टात धाव घेतली होती. या तक्रारीची दखल घेत न्यायमूर्ती (मॅट) कोर्ट श्रीमती म्रदुला भाटकर चेअरपरसन व श्रीमती मेघा गाडगीळ सदस्य या बेंचने प्रस्तुत प्रकरणी पोलीस आयुक्तालयाने सादर केलेले कागदपत्रांची पडताळणी करून पोलीस हवालदार राजकुमार श्रीमान यांच्या बाजूने न्याय दिला आहे.
राजकुमार श्रीमान यांच्या वतीने विधीज्ञ अरविंद बांदेवाडीकर व भूषण बांडेवाडीकर यांनी मांडलेल्या युक्तिवादानुसार 16 सप्टेंबर 2020 ते 31 जुलै 2022 हा सेवाबाह्य कालावधी न्यायालयीन न्याय निर्णयानुसार सदर कालवधी हा कर्तव्यकाळ म्हणून निश्चित करून त्यांच्या थकीत देय रकमा मिळणेस विनंती केली होती. ती न्यायमूर्तींनी मान्य करून तसा आदेश पारित केला आहे. न्यायालयाकडून न्याय मिळाल्याची भावना राजकुमार श्रीमान यांनी व्यक्त केली.