पवार साहेबांच्या साक्षीने राहुल गांधींना आषाढी वारीचे निमंत्रण, राहुल गांधी येणार का.?

सोलापूर : प्रतिनिधी
आषाढी वारीचे महाराष्ट्रासह भारतात आणि देश विदेशात देखील मोठ्या प्रमाणात महत्त्व मानले जाते, सर्वात मोठी वारी म्हणून देखील याकडे पाहिले जाते. पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीने वारकरी मोठ्या संख्येने पायी चालत पंढरपुरात येतात. आषाढी वारीतील वातावरण संपूर्ण विठ्ठलमय झालेले असते वारकरी एकमेकांना माऊली माऊली असे संबोधतात. हजारो वर्षाची असणारी वारीची परंपरा पाहण्यासाठी त्यामध्ये सहभागी होण्यासाठी राहुल गांधींना खासदार प्रणिती शिंदे यांनी निमंत्रण दिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांची संसद भवन दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी खासदार धैर्यशिल मोहिते पाटील, प्रणिती शिंदे, संजय दिना पाटील, सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे उपस्थित होते.
यावेळी विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा केली. महाराष्ट्रात पंढरपुर आषाढी पायी वारीची परंपरा आहे. या वारीत सहभागी व्हावे यासाठी राहुल गांधी यांना खासदार पडिती शिंदे यांनी निमंत्रण दिले आहे. वारीत राहुल गांधी सहभागी होणार का.? याकडे महाराष्ट्रासह देशाचे आणि मुख्य करून वारकऱ्यांचे लक्ष लागले आहे.