सोलापूरमहाराष्ट्रराजकीयसामाजिक
सोलापूरच्या गंभीर प्रश्नासाठी देशमुख मालकांनी घेतले पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन, बेकायदा वसुलीकडे वेधले लक्ष

सोलापूर : प्रतिनिधी
पावसाळी अधिवेशन 2024 मध्ये पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन द्वारे आमदार विजयकुमार देशमुख यांनी सोलापूर महानगर पालिकेच्या वतीने सोलापूर शहरातील रहिवाशांना मिळकत करा सोबत सरसकट पाणी बिल वाटप करण्यात येत आहे.
हा सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय आहे, हा मुद्दा उपस्थित करत नगर विकास विभागाचे महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या बेकायदा वसुलीकडे लक्ष वेधून घेतले. सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे, जिव्हाळ्याचे प्रश्न याही पूर्वी आमदार विजयकुमार देशमुख यांनी अधिवेशनात मांडून मार्गी लावले आहेत. सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी येणाऱ्या काळात भरीव काम करू अशी माहिती ही आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिली.