सोलापूरमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटप, क्रांतीवीर लहुजी शक्ती सेनेचा उपक्रम

सोलापूर : प्रतिनिधी

क्रांतीवीर लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य शाखा सोलापूर तसेच क्रांतिवीर लहुजी वस्ताद तरुण मंडळ लष्कर सोलापूर, अँरोस्ट्रक्चर सिव्हील यांच्या संयुक्त विद्यमाने सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत यांच्या कार्यकर्तृत्वाच्या सन्मानार्थ १०० जन्मठेपे बद्दल १०० सामाजिक उपक्रम अंतर्गत उपक्रम क्र. २ अर्थातच गुणवत्ता विद्याथ्य्याचा सत्कार समारंभ व शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम म.न.पा. कॅम्प शाळा लष्कर सोलापूर येथे संपन्न झाला.

कार्यक्रमास सदर बाजार पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे, जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत, काशिनाथ भतगुनकी, प्रा. दशरथ रसाळ, मुख्याध्यापक जगन्नाथ सज्जन, किशोर जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सुरेश पाटोळे यांनी सांगितले की, ‘दरवर्षी क्रांतिवीर लहुजी शक्ती सेने तर्फे समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम घेतला जातो. यावर्षी मात्र जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत यांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय विद्यार्थ्यांना व्हावा. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी आपले भविष्य घडवावे म्हणून १०० जन्मठेप १०० सामाजिक उपक्रमा अंतर्गत हा उपक्रम घेत आहोत. १०० जन्मठेपा मिळण्यासाठी यशस्वी युक्तिवाद करून १०० कुटुंबांना न्याय दिल्याबद्दल जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत यांचा विशेष सत्कार करण्यात आला. इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या शुभहस्ते झाला.

कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर जाधव यांनी केले, तर आभार शाळेचे मुख्याध्यापक जगन्नाथ सज्जन यांनी मानले. कार्यक्रमास क्रांतिवीर लहुजी वस्ताद तरुण मंडळाचे अध्यक्ष विकास जरिपटके, युवा नेते विश्वेश्वर गायकवाड, महेश जोगदंड, महेश तेजबिंदे, सिद्राम जरिपटके, अभिषेक हाटकर, अक्षय गायकवाड, समर्थ पाटोळे, आदित्य पारधे, अँड.कोळी, अँड. श्रीवास्तव, गोकुळ कांबळे, शहाने सर, हंचाटे मँडम, अरकेरी. बिराजदार सर आदीची उपस्थिती होती. यावेळी क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेचे पदाधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!