27 व्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत शिवलीला स्पोर्ट्स कराटे अकॅडमीस 38 पदके प्राप्त

सोलापूर : प्रतिनिधी (पुणे)
बिनोरीयो कराटे इंडिया व ओकिनावा मार्शल आर्ट्स अकॅडमी च्या वतीने श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बालेवाडी पुणे या ठिकाणी घेण्यात आलेल्या 27 व्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये अकॅडमीस सुवर्ण 6, रौप्य 7, कांस्य 25 एकूण 38 पदके अकॅडमीस प्राप्त झाली. या स्पर्धेमधील विजेत्या खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे, सुवर्ण पदक (कुमेते) यशराज नवले, धनराज नवले, अनन्या यावलकर, प्रसाद सलगर, वैदही नवले,
रौप्य पदक (कुमेते) शंतनू कुलकर्णी, अशोक वाघमोडे, अपूर्वा घुले, कबीर भोसले, कांस्यपदक (कुमेते) अक्षता स्वामी, आदित्य कदम, शौर्या शेलार, स्वराज भोसले, युग भोसले, रणवीर बरगंडे, समृद्धी वाणीपरीट, काव्या जगताप, जयराज नवले, प्रज्वल माने, प्रथमेश कदम, सोहम पवार, जयश्री कौडकी, हर्ष कौडकी, सार्थक पवार, मल्लिकार्जुन मुंदडगी, धनश्री मुंदडगी, समर्थ लोकरे, पियुष भोसले,
काता (सुवर्णपदक) अक्षता स्वामी, काता (रौप्य पदक) स्वराज भोसले, अनन्या यावलकर, समृद्धी वाणीपरीट, काता (कांस्यपदक) प्रसाद सलगर, आदित्य कदम, रणवीर बरगंडे, काव्या जगताप, अपूर्वा घुले, प्रज्वल माने,या सर्व विजेत्या खेळाडूंना संस्थेचे मुख्य प्रशिक्षक सेन्साई शिवशरण वाणी परीट व सहाय्यक प्रशिक्षिका स्मिता वाणी परीट यांचे मार्गदर्शन लाभले विजेत्या खेळाडूंचे भाजप आमदार देवेंद्र कोठे, संतोष पवार, सचिन स्वामी आदि मान्यवरांनी यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.