सोलापूरक्राईममहाराष्ट्रराजकीयसामाजिक

खासदार प्रणिती शिंदे, पोलीस अधिकाऱ्यांवर मनिष काळजे यांचे गंभीर आरोप, खंडणी गुन्ह्याचा केला खुलासा

सोलापूर : प्रतिनिधी

शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी घडलेल्या सर्व घटनेचा खुलासा केला यावेळी माहिती सांगताना ते म्हणाले, संबंधित आकाश कानडे हा कॉन्ट्रॅक्टर असून तो ब्लॅकलिस्टेड आहे. दोन दिवसांपूर्वी तो माझ्या संपर्का कार्यालयामध्ये आला होता. येण्यापूर्वी त्याने स्वतःहून फोन देखील केलेले आहे त्याचा रेकॉर्डिंग माझ्याकडे उपलब्ध आहे. एमआयडीसी मध्ये विकास निधी जो शासनाकडून मी आणलेला आहे ते काम मला करण्यास मिळावा असं सांगितलं. मी त्याला सांगितलं की ओपन टेंडर आहे या संदर्भामध्ये जे क्वालिफाईड होतील ज्या कंपनी चांगल्या पद्धतीचं तिथं काम करेल असा अधिकाऱ्याला वाटेल त्या पद्धतीने तुम्ही टेंडर ही प्रक्रिया होईल यामध्ये माझा कसलाही रोल नाही.

परंतु माझं म्हणणं आहे की काम हे अतिशय उत्कृष्ट दर्जाचं झालं पाहिजे याकरिता मी त्याला सांगितलं.. आणि तो ऑफिसमध्ये दोन तास माझ्या समवेत होता. यावेळी त्याच्या सोबत झालेले बोलणे हे ऑडिओ वित रे व्हिडिओ रेकॉर्डिंग उपलब्ध आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी 11 च्या सुमारास मी महानगरपालिका मध्ये कामानिमित्त गेलो असताना त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्याला मी सांगत होतो की जी कंपनी क्वालिफाईड आहे आणि ज्या कंपनीकडून चांगल्या पद्धतीचे काम होईल. ज्या कंपनीचे वर्क डन आहे याची खातरजमा करा व त्या कंपनीला वार्निंग देऊन चांगलं काम करून घेणे हे आपली जबाबदारी आहे. असे बोलत असताना तिथे आकाश कानडे नामक कॉन्ट्रॅक्टर बसला होता. तो संबंधित अधिकाऱ्यांशी वाद घालत होता की माझी कंपनी तुम्ही क्वालिफाइड करा, मलाच ते काम द्या. माझे फायनान्सर शरद तांदळे ला सांगून या मनीष काळजे यांना बघून घेतो. या संदर्भामध्ये मी सांगितलं की हा जो काही निर्णय असेल किंवा ते टेंडर प्रक्रिया असेल ही अधिकारी आणि आपण ते पाहून घ्यावं असं म्हणून मी तिथून निघून गेलो. त्यानंतर काही वेळाने मला समजले की तो माझ्या विरुद्ध तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेला आहे. यानंतर मी डीसीपी कबाडे साहेब यांना फोन केला मात्र ते फोन रिसीव केले नाहीत.

गेल्या तीन महिन्यांमध्ये आजपर्यंत माझ्यावरती तीन गुन्हे दाखल झालेले आहेत. पहिला गुन्हा हा कारच्या व्यवहारा संदर्भातल्या पैशाच्या व्यवहारा वरून माझ्यावर दाखल करण्यात आला रात्री 12 वाजता. दुसरा गुन्हा हा अतिक्रमण असलेल्या हॉटेल चालकाला मी मारहाण केली अशा आशयाचा गुन्हा दाखल करण्यात आला रात्री 1 वाजता आणि हा आता खंडणी व मारहाण याचा नव्याने तिसरा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मला या बाबतीमध्ये महत्त्वाचा खुलासा करावयाचे आहे. पहिल्या गुन्ह्यामध्ये कसलेही एव्हिडन्स नसताना माझा संबंध असताना माझ्या बदनामीसाठी गुन्हा दाखल करण्यात आला, तपासामध्ये मी त्यात दोषी नसल्याचा आढळून आलेला आहे. दुसऱ्या गुन्ह्यामध्ये मी त्या ठिकाणी चे सीसीटीव्ही मध्ये मी मारहाण केल्याचे दिसत नाही किंवा मी केलेलं नाही याची खातरजमा करून तो गुन्हा हा खोट्या स्वरूपाचा आहे असे दाखवून तो ब फायनल करण्यात आला. परत हा तिसरा गुन्हा हा माझा स्टेटमेंट न घेता माझी विचारपूस न करता कसलेही एव्हिडन्स नसताना माझ्यावरती गुन्हा दाखल झाला आहे.

एक सामान्य घरातील एक सामान्य कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने समाजसेवा करतो गेल्या दोन वर्षापासून मी शहर मध्य मध्ये विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असून. करोडो रुपयाचा निधी आणून विकास काम करतोय. हे विरोधकांना रुचत नसल्यामुळे काँग्रेसच्या खासदार आणि त्यांचे पिता माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी डीसीपी कबाडे यांच्या माध्यमातून मला त्रास देण्यास सुरुवात केली. डीसीपी कबाडे यांच्याविरुद्ध दिलेल्या तक्रारीचा राग त्यांच्या मनामध्ये असल्यामुळे या घटना माझ्यावर वारंवार होत आहेत. सत्य परिस्थिती पडताळून मी जर त्यामध्ये दोषी असेल तर माझ्यावरती योग्य ती कारवाई व्हावी मी त्यास पात्र राहील परंतु ज्याप्रकारे माझ्यावर अन्याय होत आहे. माझी नाहक बदनामी करण्यात येत आहे मला मानसिक त्रास माझ्या परिवाराला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत.

माझ्या व माझ्या परिवाराचे काही बरे वाईट झाल्यास त्या संपूर्ण जबाबदारी डीसीपी कबाडे राहतील. यासंदर्भामध्ये मी माझ्या न्यायासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करणार असून डीसीपी कबाडे यांची चौकशी होऊन त्यांना निलंबित करण्यात यावे अशी विनंती मुख्यमंत्री साहेबांना मी व माझ्या परिवाराकडून केलेली आहे. तरी माझ्यावरती दाखल झालेला गुन्हा हा धादांत खोटा स्वरूपाचा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!