कै.भानुदास शिंदे यांची परंपरा मुलाने जपली, शेकडो वारकऱ्यांना ‘पथीक सेवा’ देत कर्तव्य केले पुर्ण, ज्येष्ठ वारकऱ्यांनी भानुदास शिंदे यांच्या आठवणींना दिला उजाळा

सोलापूर : प्रतिनिधी
विठ्ठलाच्या भेटीसाठी आषाढी वारी निमित्त लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने पाई वारी करत आहेत. शेगाव येथून शेकडो वारकरी हे चालत येतात, संत गजानन महाराज यांची पालखी सोलापुरात दाखल झाली. त्यांचा उपलब्ध मंगल कार्यालयात अनेक वर्षापासून मुक्काम आहे. मुक्कामा जवळ अनेक वर्षापासून विविध समाज बांधवांकडून संतांच्या शिकवणी प्रमाणे सेवाभाव करण्याचं काम अनेक समाज बांधव करतात. त्यातील वैशिष्ट्य आहे ते चर्मकार बांधवांचं. कै. भानुदास शिंदे यांच्या स्मरणार्थ वारकऱ्यांची ‘पथीक सेवा’ करण्यात येते.
“मन चंगा तो कटोती मे गंगा” या संत रोहिदास महाराज यांच्या ओवी प्रमाणे चर्मकार समाजाचे नेते कै.भानुदास शिंदे हे मनोभावे सेवाभाव वृत्तीने वारकऱ्यांची सेवा करत होते. जसे की मोफत चप्पल, बूट शिवून देणे. बूट चपलांना पॉलिश करणे, एखादी बॅग फाटली असेल तर ती शिवून देणे. यासह अनेक सेवा ते मोफत देत होते. त्यांचा हा वारसा त्यांचे शिंदे कुटुंबीय ‘पथीक सेवा’ पुढे चालवत आहेत.
कै. भानुदास शिंदे यांचे चिरंजीव धनराज शिंदे यांनी दिवसभर शेकडो वारकऱ्यांची चप्पल, बूट शिवून, पॉलिश करून सेवा केली. खऱ्या अर्थाने आपल्या वडिलांचा वारसा पुढे चालवल्याचं अनेक वारकरी बोलत होते. शेगावच्या अनेक वयोवृद्ध वारकऱ्यांनी भानुदास शिंदे यांच्या सेवाभाव, मनमोकळे स्वभावाची आठवण देखील करून दिली. आजचे युवक हे आई-वडिलांना सोडून पुणे, मुंबई अन्यथा परदेशात जात आहेत तर दुसरीकडे “सेवा परमो धर्म” या वडिलांच्या शिकवणीला तंतोतंत पालन धनराज शिंदे यांनी करत युवकांसमोर एक आदर्श निर्माण केला.
या सेवेची सुरुवात संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
यावेळी चर्मकार समाजाचे नेते विठ्ठल व्हनमारे, जिल्हा सरकारी वकील प्रदिपसिंग राजपूत, श्रीकांत कांबळे, वामन धनशेटी, संजय राऊत, युवराज शिंदे, धनराज शिंदे, श्रीकांत कोळी, लखन गायकवाड, शेखर कोंडपुरे, विजय वाघमारे, दयानंद काटकर, आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचा सत्कार शिंदे कुटुंब यांच्या वतीने करण्यात आला. यावेळी वारकऱ्यांनी या सेवेच कौतुक करत समाधान व्यक्त केल.