६ वर्षीय यशवर्धनने रचला विश्वविक्रम, सलग २ तास २ मिनिटे २ सेकंद..?

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर शहर जिल्हा लाठी असोसिएशन तसेच पद्मशाली शिक्षण संस्था संचलित नारायणराव कुचन प्रशाला सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने १५ ऑगस्ट २०२४ रोजी संस्थेचा विद्यार्थी यशवर्धन सतिश रेब्बा, वय ०६ वर्षे यांने सलग २ तास २ मिनिटे २ सेकंद २ लाठी, २ हाताने फिरविण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. याची सुरुवात सकाळी ठिक १०.४५ मि. होवून विक्रमपुर्ती १२.४८ ला पूर्ण झाला. यशवर्धन यांने या आगळ्या वेगळया विक्रमाने भारत मातेला वंदन केले आहे.
या ऐतिहासिक विक्रम सोहळयास प्रमुख उपस्थिती बाबुराव जमादार गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती उत्तर सोलापूर, तसेच लाठी ऑर्गनायझेशनचे टेक्नीकल डायरेक्टर म. रफी शेख, लाठी इंडियाचे उपाध्यक्ष शिवराम भोसले, सोलापूर लाठी असोसिएशनचे जिल्हा सचिव व एशियन निर्णायक पंच प्रशिक्षक अश्विन कडलासकर, महिला प्रशिक्षिका तसेच राष्ट्रीय लाठी पंच सौ. अंजना कडलासकर, पद्मशाली शिक्षण समितीचे अध्यक्ष अॅड श्रीनिवास क्यातम, उपाध्यक्ष श्रीनिवास कोंडी, सचिव दशरथ गोप, सहसचिव मल्लिकार्जुन सरगम, खजिनदार गोवर्धन कमटम, विश्वस्त अशोक चिल्का, पांडुरंग दिड्डी, श्रीधर चिट्टयाल, विजयकुमार गुल्लापल्ली, निलेश सरगम, तसेच यशवर्धन चे पालक आई सौ. पुनम रेब्बा, वडिल सतिश रेब्बा त्याच बरोबर विद्यार्थी, शिक्षक, मोठ्या संख्येने यशवर्धन या विश्व विक्रमासाठी बहुसंख्येने उपस्थित होते.
यशवर्धनचा सराव मागील दोन महिन्यापासून त्याचे प्रशिक्षक, अश्विन कडलासकर यांच्या उपस्थितीत व लाठीचे महागुरु सुभाष मोहिते, लाठी इंडियाचे अध्यक्ष अजय आर शहा व शिवराम भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु होता. यशवर्धनी राज्यस्तरीय, राष्ट्रीय, व एशियन लाठी स्पर्धेत आजपर्यंत घवघवीत कामगिरी केलेली आहे.
त्यांच्या या विश्वविक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस युनिकॉन, बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये होणार आहे. विश्व विक्रमानंतर पद्मशाली शिक्षण संस्थेअंतर्गत त्यांच्या भव्य सत्कार करण्यात आला. यशवर्धनला या विक्रमासाठी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रातून अनेक शुभेच्छा व शुभार्शिवाद लाभले.