शिवसेना स्टाईलने आंदोलन, रस्त्यावर वृक्षारोपण, पालिका आयुक्त यांच्या पोस्टर ला दुग्धाभिषेक

सोलापूर : प्रतिनिधी
निराळे वस्ती ते अरविंद धाम हा डांबरी करण केलेला रस्ता ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी खोदण्यात याला मात्र मागील सहा महिन्यापासून हा रस्ता दुरुस्त करण्यात आला नाही.
त्यामुळे रस्त्यातील खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या निषेधार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने रस्त्यावर वृक्षारोपण करत महापालिका आयुक्त उपायोजनांच्या पोस्टरला दुग्धाभिषेक करण्यात आला.
वारंवार निवेदन देऊन देखील हा रस्ता दुरुस्त केला जात नाही. आता मनपा आयुक्त आणि उपायुक्त्यांच्या पोस्टरला दुग्धभिषेक करण्यात आला आहे. या आंदोलनाची दखल न घेतल्यास भविष्यात मनपा आयुक्त, उपायुक्त आणि संबंधित रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांना शिवसेना स्टाईलने जोड्याने चोप देण्यात येईल असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण आणि महेश धाराशिवकर यांनी दिला.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शहर जिल्हा पदाधिकारी कार्यकर्ते स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.