युवा भीम सेनेचे जनजागरण धरणे आंदोलन, ॲट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करा, अन्यथा..

सोलापूर : प्रतिनिधी
पुरोगामी महाराष्ट्रामध्ये मागासवर्गीयावर अन्याय अत्याचाराचे प्रमाण प्रचंड वाढले असून, राजकिय वरदहस्त व पोलिस प्रशासनाच्या अनास्था व तडजोडीच्या धोरणामुळे सर्व सामान्य मागासवर्गीय कुटूंबावर अन्याय अत्याचार खुले आमपणे होत असून, याबाबत शासन प्रशासन जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत असून अशा जातीवादी धर्माध शक्तींना तसेच गुडप्रवृत्तींच्या व्यक्तींना राजकिय वरदहस्त पोलिस प्रशासनाकडून मदत होत असल्याने याचे प्रमाण आज ग्रामीण भागामध्ये अधिक प्रमाणात वाढलेले आहे.
याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे नुकतेच मौजे महुद, ता. सांगोला, जि. सोलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते सुनिल कांबळे यांची गावगुंडांनी निर्घणपणे हत्या केलेली आहे. अशा गंभीर स्वरूपाच्या घटनेबाबत पोलिस प्रशासन तात्काळ घटनेची शहानिशा करून आरोपींना जेलबंद करणे गरजेचे व आवश्यक असताना तेथे पिडित कुटूंबियांना पोलिस प्रशासनाकडून जाणीवपुर्वक दुर्लक्षिले जात आहे. कुटूंबियाना सांत्वन करण्यासाठी युवा भिम सेनेच्यावतीने भेट घेतली असता कुटूंबियानी अन्याय अत्याचाराचा घटनाक्रम जो सांगितला व प्रत्यक्ष वस्तुस्थिती पाहिली असता पोलिस प्रशासनाकडून पिडीत कुटुंबाच्या घरासमोर पोलिस संरक्षण असणे अपेक्षित असताना पिडीत कुटुंबियाच्या घरापासून बऱ्याच अंतरावर पोलिस गाडी उभारली होती परंतू तेथे कर्तव्यावर एक ही कर्मचारी उपस्थित नव्हता.
अशी वस्तुस्थिती असल्याने युवा भिम सेना सामाजिक संघटनेच्या वतीनं ॲट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय जनजागरण करणे आंदोलन करण्यात आले ही मागणी मान्य झाली नाही तर याही पुढे तीव्र आंदोलन करू असा इशारा युवा भीमसेनेचे संसभा अध्यक्ष महेश डोलारे यांनी दिला.
ॲट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करून संबंधितांवर कडक शासन करण्यात यावेत. ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीला त्वरीत पोलिस संरक्षण देण्यात यावे व फिर्यादीविरूध्द खोटे गुन्हे दाखल होत आहेत त्यास प्रतिबंद्ध करण्यात यावेत. मौजे महुद, ता. सांगोला येथील मयत सामाजिक कार्यकर्ते सुनिल कांबळे यांच्या कुटूंबियांना शासकिय सेवेत सामावून घ्यावेत तसेच आर्थिक मदत करण्यात यावी. मौजे महुद, ता. सांगोला येथील मयत सामाजिक कार्यकर्ते सुनिल कांबळे यांच्या निघुण हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा करण्यात यावी. वरील मागण्या संघटनेच्यावतीने करण्यात आल्या.
यावेळी युवा भीमसेना संघटनेचे मल्लू कांबळे, विकास गायकवाड, वीरेंद्र जाधव, संजय हेळी, राम कांबळे, आप्पा भिसे, मुमताज तांबोळी, शकुंतला कट्टेमणी, मुमताज शेख, शुभा कांबळे, यांच्या सह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.