लाडक्या बहिणीच्या मदतीला धावला सोलापुरी भाऊ, 1 लाख भगिनीचे फॉर्म भरण्याचा अमोल शिंदे यांचा संकल्प

सोलापूर : प्रतिनिधी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना महिन्याकाठी पंधराशे रुपये मिळणार आहेत या योजनेचा फॉर्म भरून घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्या वतीने मागील तीन दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील संपर्क कार्यालयात मोफत नाव नोंदणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे.
शिवसेनेचे संपर्कप्रमुख प्रा शिवाजी सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. जुना प्रभाग क्रमांक सात यासह शहर उत्तर, मध्य, दक्षिण आणि ग्रामीण भागातील महिलाही या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.
या योजनेचा फार्म भरण्याकरिता महिलांना सोयीचे व्हावे म्हणून आयोजकांनी ऑफलाइन आणि ऑनलाईन अशा पद्धतीच्या टेबलची मांडणी काली आहे. या नेटक्या नियोजनामुळे फार्म भरताना गडबड होत असल्याचे दिसून आले नाही. असे शिबिर देगाव नाका, मड्डी वस्ती आदीसह शहरात विविध ठिकाणी आयोजन केले आहे.
या शिबिराचा लाभ घेण्यासाठी महिलांची उत्स्फूर्त गर्दी पहावयास मिळत आहे. सकाळच्या आणि दुपारच्या सत्रात येणाऱ्या महिलांसाठी चहा आणि नाष्टा देखील अमोल शिंदे यांच्या वतीने देण्यात येत आहे.
जो पर्यंत शासनाची ही योजना सुरू आहे आणि जो पर्यंत शासन महिलांना फॉर्म भरायला सांगेल तो पर्यंत ही योजना अविरतपणे चालू राहील. जवळपास या शिबिराच्या माध्यमातून एक लाख महिला भगिनींचे फॉर्म भरण्याचा उद्दिष्ट आहे.
या शिबिरात अधिकाधिक महिलांनी सहभाग नोंदवून नाव नोंदणी करावे असे आवाहन जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी केले.