शहर मध्य मध्ये प्रमोद गायकवाड यांची शांततेत क्रांती, वरीष्ठान सह मध्य मध्ये गुप्त बैठका घेण्यात व्यस्त

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या प्रणिती शिंदे या निवडून येत खासदार झाल्या. त्यामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस सह घटक पक्ष मध्ये आगामी विधानसभेचे वेध लागले आहेत.
यामध्ये अत्यंत चुरस पाहायला मिळते, ती शहर मध्य विधानसभा मतदारसंघात. येथे काँग्रेस सह दोन्ही महाविकास आघाडीतील घटक पक्ष इच्छुक असून जोरदार रस्सीखेच सुरू आहे.
माजी उपमहापौर तथा राष्ट्रवादीतील नेते प्रमोद गायकवाड हे देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटातून इच्छुक आहेत त्यांनी देखील आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी वरिष्ठ पातळीवर फिल्डिंग लावली आहे. यासह मध्य मध्ये देखील प्रत्येक समाज बांधवांच्या प्रमुखांची भेट घेत गुप्त बैठकांवर जोर दिला आहे.
शहर मध्य मध्ये दलित समाजाची संख्या मोठी आहे प्रमोद गायकवाड हें दलित चळवळीतील नेते आहेत. त्यांचा संपर्क तळागाळातल्या लोकांशी मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना मानणारा मुस्लिम समाजासह १८ पगड जातीचे लोक त्यांच्या संपर्कात आहेत. ते रोज दैनंदिन आपल्या कार्यालयात बसून सर्वसामान्यांचे गोरगरीब कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवतात.
दोन दिवसांपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सोलापूर दौऱ्यावर आले होते त्यावेळी PG ग्रुप आणि प्रमोद गायकवाड मित्र परिवाराच्या वतीने प्रमोद गायकवाड यांना उमेदवारी मिळावी यासाठी निवेदन देत आग्रहाची मागणी केली.
खासदार प्रणिती शिंदे या मागासवर्गीय असून देखील ओपन मतदारसंघातून निवडून येतात त्याचप्रमाणे प्रमोद गायकवाड हे देखील शहर मध्य मधून नक्की निवडून येतील असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांमधून व्यक्त केला जात आहे.