पाकिस्तान व दहशतवाद्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी, जवानांनावरील हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेनेची तीव्र निदर्शने

सोलापूर : प्रतिनिधी
शिवसेना UBT उत्तर सोलापूर तालुका यांच्या वतीने जम्मू काश्मीर मध्ये जवानांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना तालुका प्रमुख संजय पौळ यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.
देशाचे रक्षण करण्यासाठी तत्पर सेवा बजावणाऱ्या जवानांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला त्याच्या निषेधार्थ तालुक्यातून जमलेल्या शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी हल्लेखोर व नाकर्त्या शासनाच्या निषेधाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या.
आंदोलन प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन गुळवंची चे जेष्ठ नागरीक निसार अहमद हसन सय्यद यांच्या शुभहस्ते करून सुरवात करण्यात आले.
या प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख संजय पौळ यांनी मनोगत व्यक्त करताना सांगीतले की देशातील केंद्र शासन स्वतःला फार मोठ्या देशभक्तांचे सरकार म्हणवून घेते, 370 कलम रद्द करून काश्मीर मध्ये शांतता व सलोखा निर्माण केल्याचा आव आणते तर मग जवानांवर हल्ला झालाच कसा असा प्रश्न उपस्थित करून शासनाचा तीव्र शब्दात निषेध केला. तसेच अशाप्रकारे जवानांवर वारंवार हल्ले होतं राहीले तर ते शिवसेना खपवून घेणार नाही शिवसेना संपर्क प्रमुख अनील कोकीळ व शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांच्या मार्गदर्शना खाली रस्त्यावर उतरून शिवसेना स्टाईल ने आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला. यावेळी जमावा कडून पाकिस्तान व दहशतवाद्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली
आंदोलनास शिवसेना महिला आघाडी उपजिल्हा संघटिका सुषमा गुरव, उप तालुका प्रमुख सदाशीव सलगर, महिला आघाडी तालुका संघटिका परिनीता शिंदे, उपतालुका प्रमुख सचीन घोडके, गुळवंची उपसरपंच सुनंदा शिंदे , कारंबा उपसरपंच ज्ञानेश्वर जगताप, दादासाहेब काशीद, माजी सरपंच राजू घाटे, बाबा लोंढे, उपविभाग प्रमुख दत्तात्रय वाघमारे, दत्ता गरड, शाखाप्रमुख विष्णू भोसले, यांच्यासह असंख्य पदाधिकारी, शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.