अमोल शिंदे यांना पुन्हा मोठी जबाबदारी, शिवसेना पदाधिकारी आणि मित्रपरिवार यांनी जल्लोष करत केला सत्कार

सोलापूर : प्रतिनिधी
शिवसेना मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे पणन मंत्री अब्दुलजी सत्तार, आरोग्य मंत्री तानाजी सावंत व सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत, शिवसेना पक्ष यांच्या आदेशानुसार सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अशासकीय सदस्य म्हणून सोलापूर शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांची निवड करण्यात आली.
शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी सोलापूर शहर जिल्ह्यात शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवत कामाचा धडाका सुरू केला आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी शिवसेनेतील अमोल शिंदे यांच्या रूपाने शेतकऱ्यालाच संधी दिली आहे.
या निवडीनंतर अमोल शिंदे मित्रपरिवार, थोरला मंगळा तालीम आणि शिवसेनेचे शहर जिल्ह्यातील पदाधिकारी यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात सायंकाळी जल्लोष केला आणि या निवडीनंतर अमोल शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.