वृदध महिलेच्या गळ्यातील चैन जबरीने चोरणाऱ्याला अटक, पोलिस विनोद रजपूत यांची गोपनिय माहिती आली कामी

सोलापूर : प्रतिनिधी
०७ जुलै २०२४ रोजी फिर्यादी सौ. सविता श्रीकांत कस्तुरे, वय-७३ वर्षे, रा. ३३. लक्ष्मी विष्णु सोसायटी, कुमठा नाका सोलापूर हया १७:३० वा.चे सुमारास राहते घराजवळ सोसायटी परीसरामध्ये वॉकींग करुन राहते घराचे लोखंडी गेट उघडत असताना एका अज्ञात चोरटयाने मोटार सायकल वरुन येवून फिर्यादीचे गळ्यातील अडीच तोळे वजनाचे सोन्याचे लॉकेट जबरीने खेचून चोरी करुन तो त्याचे मोटार सायकलवरुन पळून गेला होता. सदर प्रकरणी फिर्यादी यांनी, दिलेल्या तक्रारीवरून सदर बझार पोलीस ठाणेस गुरक्र ५३८/२०२४, भा.न्या.सं. कलम ३०९ (४) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदरचा जबरी चोरीचा गंभीर स्वरुपाचा गुन्हा हा भरदिवसा लोकवस्तीमध्ये घडल्याने पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांचे मार्गदर्शनानुसार, गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली काळे, सहा. पोलीस आयुक्त राजन माने तसेच गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल दोरगे यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे सह घटनास्थळास भेट दिली व गंभीर स्वरुपाचा गुन्हा उघडकीस आणणे बाबत मार्गदर्शन केले होते. त्या अनुषंगाने सपोनि दादासो मोरे व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार हे तांत्रीक पुरावे व बातमीदारा मार्फत गुन्हा उघडकीस आणणेचा कसोशीने प्रयत्न करीत होते.
१५ जुलै २०२४ रोजी सपोनि दादासो मोरे याचे तपास पथकातील पोलीस अंमलदार इम्रान जमादार व विनोद रजपूत यांना सदरचा गुन्हा हा, पुणे पोलीस आयुक्तालयाचे अभिलेखावरील सराईत गुन्हेगार नामे सुमित गोविंद इंगळे मुळ रा. श्रीपत पिंपरी ता. बार्शी जि. सोलापूर याने केला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली. त्या अनुषंगाने सदर आरोपीस ताब्यात घेवून त्यास १६ जुलै २०२४ रोजी अटक करण्यात आली.
सदर रेकॉर्डवरील चैन स्नॅचर सुमित इंगळे यास विश्वासात घेवुन त्याचेकडे कौशल्याने तपास केला असता त्याने वरील नमुद गुन्हा केल्याची कबूली दिली. त्यानंतर सपोनि दादासो मोरे व पथकाने या आरोपीकडून २५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे लॉकेट व ०१ मोटार सायकल असा एकुण १,५०,०००/- रुपये किंमतीचा मुददेमाल सविस्तर पंचनाम्याने जप्त करुन, जबरी चोरीचा गंभीर स्वरुपाचा गुन्हा उघडकीस आणला आहे.
सदरची कामगिरी एम राज कुमार, पोलीस आयुक्त सोलापुर शहर, डॉ. दीपाली काळे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, राजन माने, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे, तसेच सुनिल दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शना खाली, गुन्हे शाखेकडील नेमणुकीचे सपोनि दादासो मोरे व त्यांचे पथकातील पोलीस अंमलदार दिलीप किर्दक, संदीप जावळे, विनोद रजपुत, राजकुमार पवार, इम्रान जमादार, सिध्दराम देशमुख, अजय गुंड, शैलेश बुगड, सायबर पो. स्टे कडील प्रकाश गायकवाड, मच्छिद्र राठोड, चापोकों/ गुरव, चापोह/बाळासाहेब काळे यांनी केली आहे.