प्रसारमाध्यमांशी बोलण्यासाठी काँग्रेसकडून १५ प्रवक्ते, सोलापुरातून कोण.?

सोलापूर : प्रतिनिधी
राज्यातील जनतेला सत्य कळावे आणि सत्ताधाऱ्यांच्या खोट्या प्रचाराला पायबंद घालण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने पत्रकार आणि वृत्त वाहिन्यांशी बोलण्यासाठी १५ प्रवक्ते आणि नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे.
सत्ताधारी पक्षाकडून खोटी माहिती पसरवून राज्यातील जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांची छायाचित्रे, व्हिडिओ संपादित करून त्यांचा आयटी विभाग मोठ्या प्रमाणात खोट्या बातम्या पसरवत आहे. त्यासाठी काँग्रसने माध्यमांशी बोलण्यासाठी १५ नेत्यांची निवड केली आहे. पक्षाचे प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या आदेशानुसार प्रदेश काँग्रेसने नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अन्य १५ जणांवर ही जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच माणिकराव ठाकरे, सतेज ऊर्फ बंटी पाटील, आरिफ नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, डॉ. नितीन राऊत, अॅड. यशोमती ठाकूर, अमित देशमुख, डॉ. विश्वजीत कदम, अतुल लोंढे, सचिन सावंत, चरणसिंग सप्रा यांची यासाठी नेमणूक करण्यात आली आहे.
सोलापुरातून खऱ्या अर्थाने राज्य पातळीवर आपला ठसा उमटवणारे काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, माजी आमदार, नूतन खासदार, प्रवके, हे असून देखील यांच्या पैकी एका चीही नियुक्ती यादीत झाली नाही. सोलापूर शहर जिल्ह्यातून एका तरी पदाधिकाऱ्याचे नाव यावे अशी मागणी काँग्रेसचे कार्यकर्ते करत आहेत.