अंतरवालीच्या मार्गावर मराठा-ओबीसी कार्यकर्ते आमने-सामने, जोरदार घोषणाबाजी

सोलापूर : प्रतिनिधी
जालन्यामध्ये मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलक समोरासमोर आले आहेत, यानंतर दोन्ही बाजूंकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. वडिगोद्री येथे लक्ष्मण हाके यांच्या उपोषण स्थळासमोरच दोन्ही समाजाकडून घोषणाबाजी करण्यात आली.
यानंत पोलिसांनी दोन्ही समाजाच्या आंदोलकांची समजूत काढून त्यांना पांगवलं.
मराठा आरक्षण समर्थक आणि पोलिसांमध्ये पुन्हा बाचाबाची पाहायाल मिळाली आहे. पोलिसांनी अंतरवाली कडे जाणारा रस्ता बंद केल्याचा आरोप जरांगे यांच्या समर्थकांनी केला आहे. वडीगोदरी फाट्यावर लक्ष्मण हाके यांचे आंदोलन सुरू आहे. त्याच फाट्यावरून अंतरवाली कडे जाणारा रस्ता आहे.
जरांगे यांच्या समर्थकांना त्याच फाट्यावरून अंतरवाली कडे जावे लागते. ओबीसी आणि जरांगे यांच्या समर्थकांचा संघर्ष छोट्या गोष्टी वरून होऊ शकतो, म्हणून अंतरवाली कडे जाणारा पर्यायी रस्ता वापरावा असं आवाहन पोलिसांनी केलं. तसंच तो रस्ता काही काळासाठी बंदही केला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये तसंच ओबीसी आरक्षण वाचवण्याच्या मागणीसाठी लक्ष्मण हाके वडीगोदरी येथे उपोषणाला बसले आहेत.