युवराज राठोड यांनी दक्षिण मध्ये हिंदू मुस्लिम एकतेचा दिला धडा, मंद्रूपच्या इतिहासात पहिल्यांदाच कवालीचा कार्यक्रम
हिंदू मुस्लिम शीख ईसाई एक है, सबका हिंदुस्तान है कव्वालीने गायनाचा प्रारंभ

सोलापूर : प्रतिनिधी
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथे पहिल्यांदाच मंद्रूपच्या इतिहासात हिंदू मुस्लिम शीख-ईसाई एक है, सबका हिंदुस्तान है कव्वालीने गायनाचा प्रारंभ करण्यात आला. हा कवालीचा कार्यक्रम सोलापुरातील सोनाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष युवराज राठोड यांनी सर्वधर्म समभावतेच्या प्रतीकतेचा संदेश दिला आहे.
या कव्वाली कार्यक्रमाचे उद्घाटन मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार, पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डांगे व सोनाई फाउंडेशनचे युवराज राठोड, शिवसेना जिल्हा उपप्रमुख शिंदे गटाचे अण्णाप्पा सतुबर यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी मंद्रूपच्या प्रथम नागरिक सरपंच अनिता कोरे, दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे माजी सभापती गुरुसिद्ध म्हेत्त्रे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष माळसिद्ध मुगळे, अध्यक्ष यासीन मकानदार, पत्रकार बबलू शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
सुमारे 3000 पेक्षा अधिक जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित होता. या कव्वालीच्या कार्यक्रमातून हिंदू आणि मुस्लिम हे दोन्ही भाऊ- भाऊ असून ते एकमेकांच्या हातात हात घालून आपल्याला. पुढे जायचं आहे, असा एकात्मतेचा संदेश यावेळी देण्यात आला.
नागरिक मंत्रमुग्ध
सुमारे दोन तास चाललेल्या या कव्वालीच्या कार्यक्रमास मंद्रूप व परिसरातील महिलाची मोठ्या संख्येने उपस्थित होते. कव्वालीचा कार्यक्रम बघून सर्वजण मंत्रमुग्ध झाले होते. हा सर्व प्रकार बघून नागरिक भारावून गेले होते.
मुस्लिम बांधवांसह हिंदू बांधवांनी ही युवराज राठोड यांचे आभार मानत हिंदू मुस्लिम एकतेची ही वज्रमूठ दक्षिण मध्ये आपण कायम ठेवू अशा भावना यावेळी व्यक्त केली.