सोलापूरमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

अजित दादांच्या वाढदिवसा निमित्त घेण्यात आलेल्या सामाजिक उपक्रमांची सोलापूर शहरात मोठी चर्चा, फिरता दवाखान्याचे उद्घाटन तर राज्यस्तरीय मेहंदी स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न

सोलापूर : प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त माझा प्रभाग माझे कुटूंब, आरोग्यची वारी आपल्या दारी, या संकल्पनेतून प्रभाग क्र 10 गोंधळी वस्ती येथे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार व कार्यध्यक्ष जुबेर बागवान यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला समन्वयक शशिकला कसपटे यांच्या शुभ हस्ते या आरोग्य व्हॅन (फिरता दवाखाना) आरोग्य वारीचे गोंधळी वस्ती येथे शुभारंभ करण्यात आला.

ही आरोग्य वारी रंगराज नगर, ए बी सी डी जी एफ ग्रुप, सागर चौक, लक्ष्मी चौक, पोशम्मा मंदिर सर्व प्रभागात नागरिकांपर्यंत जाईल मोफत आरोग्य तपासणी औषधोपचार केला जाणार असून याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन या आरोग्य वारीच्या शुभारंभाच्या प्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार केले.

या व्हॅन मधे डाॅक्टर, सिस्टर, ब्रदर, औषध गोळ्या बी पी तपासणी, शुगर तपासणी याची सर्व व्यवस्था केली आहे या उपक्रमांचे आयोजन VJNT शहराध्यक्ष रुपेशकुमार भोसले यांनी केले. पिंडीपोल हाॅस्पिटल डाॅ श्रीनिवास पिंडीपोल व त्यांच्या पत्नी डाॅ सौ पिंडीपोल व इतर त्यांचे सहकारी डाॅक्टर यांचा सहभाग आहे.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, महिला समन्वयक शशीकला कसपटे, युवती अध्यक्ष किरण माशाळकर, सोशल मिडीया कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे, संतोष शांदे पाटील, ज्ञानु शिंदे पाटील, रवि वाघमारे, सनि वाघमारे, मारुती पाचंगे, गोपाळ पाचंगे, नागनाथ पाचंगे, यांच्यासह जेष्ठ नागरीक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टी सोलापूर च्या वतीने राज्यस्तरीय मेहंदी स्पर्धा 

जनविश्वास सप्ताह अंतर्गत आज राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टी व हिना बुटीक यांच्या वतीने राज्यस्तरीय मेहंदी स्पर्धा २०२४ चे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम गणेश पेठ कन्ना चौक येथील हिना बुटिक या शॉप मध्ये पार पडला. या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष संतोष पवार, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. सुरुवातीस उपस्थित मान्यवरांचा सत्कार संप्पन झाला.

या स्पर्धेस प्रचंड असा प्रतिसाद मिळाला. सकाळ पासूनच स्पर्धेत सहभागी युवतींची मेहंदी काढण्या साठी लगबग पाहायला मिळाली. राष्ट्रवादी युवती काँग्रेस च्या वतीनं स्पर्धेच्या माध्यमातून युवतींना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम केले. या स्पर्धे मध्ये मनस्वी पेंडकर प्रथम क्रमांक, मुस्कान नदाफ द्वितीय क्रमांक, जीक्रा फणीबाद तृतीय क्रमांक, भक्ती गवळी चौथा क्रमांक, झीनत इनामदार पाचवा क्रमांक मिळाला आहे.

विजेत्या स्पर्धकांना जिल्हाध्यक्ष संतोष पवार, रील स्टार तेजस्विनी बिराजदार, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे यांच्या शुभहस्ते आकर्षक ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. तर सहभागी अन्य स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नारायण माशाळकर यांनी केले तर आभार हिना बुटीक चे व्यवस्थापक तथा फॅशन डिझायनर सैफन इनामदार यांनी मानले. यावेळी मेहंदी आर्टिस्ट नर्गिस शेख, समाज सेविका शकुंतला गवळी, नावेद दलाल, आर्फात शेख, सद्दाम शेख, फोटो ग्राफर सिद्धार्थ भीमळी नामदेव गायकवाड यांच्या सह स्पर्धेत सहभागी युवतींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!