सोलापूरमहाराष्ट्रराजकीयसामाजिक
घासून नाही तर ठासून, महायुतीचा महाविजय असे म्हणत अजित पवारांच्या राष्ट्रवादी युवक युवतीने केला जल्लोष

सोलापूर : प्रतिनिधी
राज्यात महायुतीचे जास्तीत जास्त आमदार निवडून येत सत्ताही आमचीच येणार असे म्हणत घासून नाहीतर ठासून महायुतीचा महाविजय अशा घोषणांचा सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक आणि युवती काँग्रेसच्या वतीने चार हुतात्मा पुतळा चौक येथे जल्लोष करण्यात आला यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना पेढे देखील भरवण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, अजित पवार यांच्यावर विश्वास ठेवून राज्यातील जनतेने महायुतीला जिल्ह्यात कौल दिला. सोलापूर शहरातील तिन्ही महायुती भाजपाचे उमेदवार हे विजय होतील असा विश्वास व्यक्त करत लाडक्या बहिणीने देखील महायुतीला कौल दिल्याचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष सुहास कदम आणि युवती अध्यक्ष किरण माशाळकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.