जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी ॲड शकील नाईकवाडी यांना अटकपूर्व जामीन मंजूर

सोलापूर : प्रतिनिधी
नागराज मल्लिनाथ स्वामी वय 21 राहणार विडी घरकुल हैदराबाद रोड यास चाकूने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ॲड शकील इब्राहिम नाईकवाडी वय 29 राहणार मार्केट यार्ड चौक सोलापूर यास जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश राणे यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला.
या हकीकत अशी की दिनांक 27 जून 2024 रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास नागराज स्वामी हा त्याच्या घराकडे जात असताना चायनीज दुकाना समोर गर्दी जमलेली होती तेथे त्याचा मित्र विशाल चंदनशिवे व चायनीज दुकानदार यांच्या मध्ये भांडणे चालू होती. त्यावेळी नागराज स्वामी हा विचारण्यास मधी गेला असता त्यास इमरान नाईकवाडी व शकील नाईकवाडी यांनी कोबी कापायच्या चाकूने पाठीवर हातावर मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. अशा आशयाची फिर्याद नागराज मल्लिनाथ स्वामी यांनी जेलरोड पोलीस ठाणे येथे दिली होती.
आपणास अटक होऊ नये म्हणून ॲड सलीम नाईकवाडी यांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी ॲड मिलिंद थोबडे यांच्यामार्फत जिल्हा न्यायालयात अर्ज ठेवला होता. अर्जाच्या सुनावणीच्या वेळेस ॲड मिलिंद थोबडे यांनी आपले युक्तीवादात फिर्यादीचे अवलोकन केले असता सकृत दर्शनी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा निष्पन्न होत नसल्याचा व्यक्तिवाद मांडला. त्यावरून न्यायाधीशांनी 50 हजार रुपयांच्या जात मचुलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला.
यात अर्जदारा तर्फे ॲड मिलिंद थोबडे, ॲड एच एच बडेखान, ॲड असीम बांगी, ॲड जाहीद दर्जी, ॲड इक्बाल शेख यांनी तर सरकारतर्फे ॲड दत्तूसिंह पवार यांनी काम पाहिले.