बापूसाहेब सदाफुले भेटले एकनाथ भाई आणि अजित दादांना, 6 एप्रिल 1995 नंतरचे रोजंदारी कर्मचाऱ्यांन साठी गाठली मुंबई, 25 जानेवारी 2022 ची करून दिली आठवण

सोलापूर : प्रतिनिधी
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीने अध्यक्ष बापूसाहेब सदाफुले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले. सध्य स्थितीला सोमपा 249 विविध संवर्गातील रोजंदारी कर्मचारी कार्यरत असून या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम स्वरूपी सामावून घेण्यासंदर्भात 25 जानेवारी 2022 रोजी नगर विकास खाते मंत्री असताना आपल्या समवेत व्ही.सी द्वारे बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये सोलापूर महानगरपालिका मधील 249 रोजंदारी कर्मचाऱ्यांना एक खास बाब म्हणून सेवेत नियमित करण्याचा ठराव आपल्या उपस्थिती मध्ये पास झाला होता.
त्या अनुषंगाने दिनांक 19 में 2023 रोजी सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम स्वरूपी सामावून घेण्याकरता नगर विकास खात्याकडे प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्ताव नगर विकास खात्याकडे पाठवून दोन वर्षे उलटून गेली अद्याप त्यावर कसलीही कार्यवाही होताना दिसून येत नाही यामुळे रोजंदारी कर्मचाऱ्यांमध्ये भीती व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गेली २५ ते ३० वर्ष सोलापूर महानगरपालिकेमध्ये हे कर्मचारी साफसफाईचे काम करतात. कचरा उचलणे, ड्रेनेज साफ करणे, नाले साफसफाई करणे, मेलेली जनावरे उचलणे इत्यादी प्रकारची नित्य नियमाने रोज नागरिकांची प्रामाणिकपणे सेवा करत असताना.
कोरोना सारख्या संसर्ग महामारीच्या रोगांमध्ये आपल्या कुटुंबाची तमा न बाळगता आपली सेवा बजावली आहे. अशा प्रकारचे साफसफाईचे काम करत असताना अनेक कर्मचाऱ्यांना रोगराईचा सामना करावा लागत आहे अनेक कर्मचारी मरण पावले आहेत तर अनेक कर्मचाऱ्यांचे वय झाल्यामुळे ते सेवानिवृत्त होत आहेत.
यातील बहुतांश कर्मचारी मागासवर्गीय असून आज तागायत त्यांना सेवेत कायम न केल्यामुळे एक प्रकारे त्यांच्यावर खूप मोठा अन्याय झालेला आहे तरी मुख्यमंत्री आपल्या सारख्या सामान्य कुटुंब मधून आलेल्या कर्तव्यदक्ष मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या कार्य कालखंडामध्ये या 249 विविध संवर्गातील रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचे निर्देश नगर विकास खात्यास करून या कर्मचाऱ्यांना आपण आपल्या माध्यमातून न्याय मिळवून द्यावा असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्याचे प्रधान सचिव गोविंद राज यांच्याशी फोनवरून चर्चा करणार असल्याचे अध्यक्ष बापूसाहेब सदाफुले यांना सांगितले.