प्रणिती शिंदेच्या संसदेतील मराठा आरक्षण विषयावर तीव्र पडसाद, शशी भाऊंनी नोंदवला निषेध तर रसाळे मामांनी केले अभिनंदन

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये चाललेल्या मराठा आरक्षण च्या संदर्भात आवाज उठवला आणि मराठा समाजाला आरक्षण देणे कसे गरजेचे आहे हे नमूद केले. त्यांनी जो लोकसभेमध्ये आवाज उठवला त्याबद्दल मराठा क्रांती मोर्चा सोलापूर च्या वतीने आम्ही त्यांचे आभार मानतो अशी प्रतिक्रिया सुनील रसाळे यांनी दिली.
निवडणुकीच्या काळामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी जो आदेश दिला आणि महाराष्ट्र मध्ये अनेक मराठा समाजाच्या कार्यकर्त्यावर गंभीर रित्या गुन्हे दाखल केले. गुन्हे पाठीमागे घेतो असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला होता पण तो शब्द त्यांनी अखेर फिरवला आणि अनेक सुशिक्षित युवकांचे केसेस दाखल करून त्यांची जीवन उद्ध्वस्त करून पाहणाऱ्या शासनाला मराठा समाजाने विरोध केला त्यांच् पोट तिडकीचा प्रश्न त्यांनी मांडला मोहोळ, पंढरपूर, मंगळवेढा शहराच्या पश्चिम भागामध्ये मराठा समाजाने खासदार प्रणिती शिंदे यांना भरघोस मतदान केले याची जाणीव खासदार प्रणिती शिंदे यांनी ठेवून लोकसभेमध्ये मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न पोट तिडके ने मांडला बदल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने समन्वय सुनील रसाळे यांनी अभिनंदन केले.
तर दुसरीकडे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक शशी थोरात यांनी खासदार प्रणिती शिंदे यांनी संसदेत मराठा आरक्षणाचा मांडलेला मुद्दा हा अर्धवट असून त्यांचा समाचार घेत निषेध व्यक्त केला.
लोकसभा मद्ये सोलापूरचे खासदार प्रणिती शिंदे यांनी नुकतेच मराठा समाजाला व धनगर समाजाला आरक्षण द्या असा प्रश्न मांडला वास्तविक पाहता मराठा समाजाची मुख्य मागणी ला बगल देत केंद्र सरकार कडे मराठा समाजाची जी मागणी आहे 50% च्या आत मधून आरक्षण द्या ही भूमिका मांडणं अपेक्षित होते. पण तस न करता नुसत आरक्षण द्या म्हणणे मराठा समाजाची जी मागणीची त्याची चेस्टा केल्या सारखं आहे.
धनगर समाजाला एस टी मधून आरक्षण द्या हे आवरजून सांगतात पण मराठा समजा ला ओबिसी मधून आरक्षणाची मागणी करत नाहीते. ही सरळ सरळ समाजाची दिशाभूल करत आहे अशी निरर्थक मागणी करून उलट संसदेत मराठा आरक्षण बद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न खा. शिंदे करत आहे. खा. शिंदेंनी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्या अशी मागणी केली नाही याचा आम्ही निषेध करतो असे म्हणत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक शशी थोरात यांनी आपली प्रतिक्रिया दिली.