लायन्सचे डिस्ट्रिक्ट कॅबिनेट इन्स्टॉलेशन ‘मोरपीस’ सोलापुरात

सोलापूर : प्रतिनिधी
२५ व २८ जुलै रोजी मयूर क्लासिक बैंक्वेट हॉल, सोलापूर येथे लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी १ चे डिस्ट्रिक्ट कॅबिनेट इन्स्टॉलेशन संपन्न होणार असल्याची माहिती ऍड एम के पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. या कार्यक्रमासाठी माजी इंटरनॅशनल डायरेक्टर लायन विनोद खन्ना, अभिजीत धर्माधिकारी या कार्यक्रमासाठी येत आहेत. या डिस्ट्रिक्ट मध्ये एकूण ८० क्लब्ज् येतात. डिस्ट्रिक्ट कॅबिनेट इन्स्टॉलेशन ‘मोरपीस’ साठी जिल्ह्यातून लायन्स सभासद येण्याची अपेक्षा आहे.
सोलापूर शहरामध्ये एकूण ८ क्लब असून जिल्ह्यामध्ये एकूण १९ लायन्स क्लब कार्यरत आहेत. ८०० पेक्षा जास्त सदस्य सोलापूर जिल्ह्यामध्ये समाजसेवेचे कार्य करतात. सोलापूर जिल्ह्यामध्ये लायनीजमची सुरुवात १९६१ साली झाली. यावर्षी म्हणजेच १ जुलै २०२४ पासून लायन अॅड. एम. के. पाटील हे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर म्हणून काम पाहत आहेत. हा डिस्ट्रिक्टचा बहुमान लाडॉ. सोलापूरला लायन अॅड. एम. के. पाटील यांच्या रूपाने सातव्यादा मिळत आहे. याआधी लायन डॉ. नारायणदास चंडक, लायन डॉ. गुलाबचंद शहा, लायन अशोक मेहता, लायन डॉ. सिकट यजुर्वेदी, आणि लायन अरविंद कोणशिरसगी यांच्या रूपाने बहुमान सोलापूरला मिळाला होता.
२०१८ नंतर यावर्षी प्रथमच हा डिस्ट्रिक्ट गव्हर्नरशिपचा बहुमान सोलापूरला परत एकदा कासलीवाल मिळत आहे. लायन अॅड. एम. के. पाटील हे स्वतः मेलबर्न, ऑस्ट्रेलिया येथे प्रांतपाल पदाची सूत्रे हाती घेण्यासाठी आणि शपथ घेण्यासाठी गेले होते. लायन्स संघटनेची स्थापना सन १९१७ साली मेल्विन जोन्स या इन्शुरन्स एजंटनी केली. तेव्हापासून आत्तापर्यंत गेल्या १०७ वर्षांमध्ये लाईनीझम हा संपूर्ण जगामध्ये पसरला आहे. जगातील एकूण २०९ देशांमध्ये १३ लाखांपेक्षा जास्त सदस्य संख्या असलेला हा लायन्स इंटरनॅशनल एकूण ४६००० क्लबच्या माध्यमातून समाजसेवेचे कार्य करीत आहेत. १०० वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुढील शंभर वर्षांसाठी समाजसेवेसाठी काही उद्दिष्टे लायन्सनी घेतलेली आहेत. त्यामध्ये मधुमेह, पर्यावरण, आपत्कालीन सेवा, लहान मुलांमधील कॅन्सर, भूकेलेल्यांना अन्न, दृष्टी, युवा आणि माणुसकीसाठीची सेवा या सर्व विविध क्षेत्रांमध्ये काम करण्याचे पुढील शंभर वर्षांमध्ये निश्चित केले आहे. लायन अॅड. एम. के. पाटील यांनी यावर्षी लायन्स ची सभासद संख्या वाढवणे आणि लायनीजम तरुणांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न करण्याचे निश्चित केले आहे. त्याशिवाय संपूर्ण डिस्ट्रिक्टमध्ये एकाच दिवशी एकाच प्रकारची सेवा कार्ये केली जाणार आहेत. त्यांना त्यांनी मेगा इव्हेंट्स हे नाव दिले आहे. रक्तदान, वृक्षारोपण, रस्ता सुरक्षा आणि जुळ्यांसाठी प्रबोधन अशा चारही क्षेत्रांमध्ये यावर्षी मेगा इव्हेंट्स राबवले जाणार आहेत. अशा प्रकारचे आवाहन लायन अॅड. एम. के. पाटील यांनी सर्व लायन्सना केले आहे.
मोरपीस डिस्ट्रिक्ट कॅबिनेट इन्स्टॉलेशन हे या वर्षीचा सुरुवातीचा शपथ व पदप्रदान विधी आहे. पत्रकार परिषदेस राजेंद्र शहा, व्यंकटेश यजुर्वेदी, डॉ अभिजीत जोशी, महेश नळे, माणिक गोयल, गंगाप्रसाद बंडेवार उपस्थिती होते.