बाबा मिस्त्री पुन्हा एकदा दक्षिणमधून इच्छुक, मागील पराभवाचा यंदाच्या वेळेस वचपा काढणार का.? काँग्रेसकडून तिकिट मिळणार.?

सोलापूर : प्रतिनिधी
दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून मौलाली सय्यद बाशुमिय्या (बाबा मिस्त्री) यांनी आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकित काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागणीचा अर्ज शनिवार २७ जुलै २०२४ रोजी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडे काँग्रेस भवन सोलापूर येथे सादर केला.

यावेळी अँड अब्दुल पठाण, बुरहान मुल्ला, अझर शेख, किसन मेकाले, तिरुपती परकीपंडला , भीमाशंकर टेकाळे, NK क्षीरसागर, विजय शाबादी, शिरीष जाधव, सलीम मणूरे, राजू गडदे, मोहसीन फुलारी, महादेव येरनाळ, यतिश देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते.
दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून मागील निवडणुकीत बाबा मिस्त्री यांनी भाजपचे विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांना चांगली लढत दिली होती. गोरगरिबांना कष्टकऱ्यांना मदत करणारा, सिव्हील हॉस्पिटल मधील रुग्णांच्या मदतीला धावणारा नगरसेवक म्हणून बाबा मिस्त्री यांची ओळख आहे त्याच प्रमाणे मुस्लिम समाजात देखील स्वच्छ प्रतिमेचा व्यक्ती म्हणून बाबाला बसंती मिळेल असा विश्वास बाबा मिस्त्री यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

परंतु काँग्रेस मधील ज्येष्ठ नेते, दक्षिण मधील काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी काँग्रेसमध्ये सक्रिय होत लोकसभेमध्ये प्रणिती शिंदे यांना मदत करत चांगले मतदान मिळवून दिले. त्याच प्रमाणे दक्षिण विधानसभा मतदारसंघात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. त्यामुळे तिकीट कोणाला मिळणार यावरून बाबा मिस्त्री पुढची भूमिका काय घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.