सोलापूरमहाराष्ट्रशिक्षणसामाजिक
महाराष्ट्राचे क्रीडामंत्री दत्तामामा भरणे यांनी ग्रेस गुणाबाबात सोलापुरच्या शिष्टमंडळास दिले अश्वासन

सोलापूर : प्रतिनिधी
भरणेवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे त्यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री दत्तामामा भरणे यांना महाराष्ट्र राज्यातील दहावी, बारावीच्या खेळाडूंना मिळणाऱ्या ग्रेस गुणाबाबत आपले सरकार या ॲप मधील अठरा त्रुटी रद्द करण्याची माहितीचे निवेदन सोलापूर शहर व जिल्हा शारीरिक शिक्षण क्रीडा शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.सचिन गायकवाड, शहर अध्यक्ष प्रा.संतोष खेंडे, सचिव सुहास छंचुरे, उपाध्यक्ष गंगाराम घोडके, सहसचिव श्रीधर गायकवाड, प्रशांत शिताप यांनी दिले.
क्रीडामंत्री भरणे मामा यांच्या बरोबर ग्रेस गुणाबाबत चर्चा करताना मुंबई येथे या सर्व त्रुटी रद्द करणेबाबत निर्णय घेऊ असे आश्वासन दिले.
या आहेत ॲप मधील त्रुटी
- स्कूल कोड मध्ये युडायस किंवा इंडेक्स नंबर यापैकी एक असवा
- विद्यार्थ्यांचा पत्ता मोबाईल नंबर , इमेल आयडी झेंडर वय जन्मतारीख शाळेचा पत्ता पिन कोड टेलिफोन नंबर कॅटेगरी सब कॅटेगरी, डिलिव्हरी मोड यांची आवश्यकता नाही
- ऑनलाइन फॉर्म सबमिट केल्यानंतर एडिट ची सोय असावी
- आट्यापाट्या, वुशू, क्रिकेट, थ्रो बॉल सपटटाकरा या पाच खेळांचा समावेश करावा
- होम पेज वर एकच फॉर्मेट असावा
- आपले सरकार या ॲप मध्ये
- क्रीडा शिक्षकांच्या लॉगिन वरती सर्व फॉर्म भरण्यात यावा.