मराठा क्रांती मोर्चाची पुन्हा वज्रमुठ, जरांगे पाटिल यांचे करणार जल्लोषात स्वागत, जिल्ह्यात दौरे तर शहरात बैठकांचे आयोजन

सोलापूर : प्रतिनिधी
मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या दौऱ्यावर येणार असून त्याचे नियोजन त्यांच्या वतीने जाहीर करण्यात आले. पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात दौरा करण्यापूर्वी याची सुरुवात सोलापुरातून होणार आहे. त्यांच्या या दौऱ्याची नियोजन करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा सोलापूरच्या वतीने बैठक घेण्यात आली.
मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील हे बुधवार दि. ७ ऑगस्ट २०२४ रोजी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत त्यांच्या दौऱ्याबाबत माहिती देण्यासाठी २९ जुलै २०२४ रोजी हॉटेल ऐश्वर्या, चार हुतात्मा पुतळ्या जवळ, सोलापूर येथे सकाळी ११ वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे.
या बैठकीत मराठा क्रांती मोर्चा सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती यांच्या वतीने सोलापूर शहरात घेण्यात येणाऱ्या बैठका आणि जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात नियोजन बैठक घेण्यासह करण्यात येणाऱ्या नियोजनाची माहिती देण्यात येणार आहे.
आजच्या मराठा क्रांती मोर्चा बैठकीस ज्येष्ठ समन्वयक दास शेळके, दिलीप कोल्हे, अमोल शिंदे, श्रीकांत घाडगे, प्रताप चव्हाण, आनंद जाधव, तुकाराम मस्के, रवी मोहिते, बाळासाहेब गायकवाड, महेश धराशिवकर, योगेश पवार, शेखर फंड, शिरीष जगदाळे, किरण पवार, महेश कुलकर्णी, निलेश शिंदे, यांच्या सह मराठा क्रांती मोर्चा, सोलापूर आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती सोलापूर सदस्य उपस्थित होते.