सोलापूरक्राईममहाराष्ट्रसामाजिक
शहरातील शासकीय जागेत सुरू असणारा अवैध दारू अड्डा, अवैध जुगार तत्काळ बंद करा

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर शहरातील शासकीय ओपन जागा, बंद असलेल्या स्थितीत शासकीय कर्मचाऱ्यांची वसाहत, जिल्हा क्रीडा संकुलन, पुंजाल मैदान, चिपा मार्केट, जुने कलेक्टर ऑफिस, अशा अनेक शासकीय जागेवर मालमत्तेच्या ठिकाणी अवैध दारू अड्डा तसेच अवैद्य जुगार सुरू असतो.
तात्काळ अशा ठिकाणी शासकीय जागेच्या मालमत्तेवर प्रशासनाने सर्वे करून जागा ताब्यात घेऊन सदर ठिकाणी कुंपण असणे गरजेचे आहे. अशा घडणाऱ्या घटना थांबायला हवेत या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. सदर निवेदनावर जिल्हाधिकारी यांनी तात्काळ लक्ष देऊन प्रश्न व अडचणी सोडवण्यात येईल अशी हमी दिली.
यावेळी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते ज्योतिबा गुंड, रुग्णसेवक रुपेशकुमार भोसले, शिवराज विभुते, अनिल जाधव व गणेश छत्रबंद यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.