महेश नवमी निमित्त घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात 85 गरजूंनी घेतला लाभ, गरजूंनी सोलापूर जिल्हा माहेश्वरी सभेचे मानले आभार

सोलापूर : प्रतिनिधी
महेश नवमी निमित्त सोलापूर जिला माहेश्वरी सभा व हृदयम सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. राजाराम सत्यनारायणजी जाखेटिया यांच्या स्मरणार्थ हृदयम आरोग्य निदान शिबीर घेण्यात आले. या शिबिरात जवळपास 85 गरजूंनी बीपी, शुगर, ECG तपासून घेत आपल्या आजारावर योग्य ते मार्गदर्शन घेतले.
शिबिराचे उद्घाटन डॉ.वैशंपायन मेडिकल कॉलेज प्रभारी डिन, स्त्रीरोग विभाग प्रमुख, विद्या किरनकर यांच्या हस्ते झाले हुदयम मल्टी स्पेशालिटी हाॅस्पिटल आणि रिसर्च सेंटर सोलापूर हुदयरोग तज्ञ डॉ शैलेश पाटील, डॉ निलेश मासुरणे यांची प्रमुख उपस्थिती होती. रमेश जवळगी, स्वाती दिवेकर, आदिती लाडे, प्राजक्ता राठोड, समर्थ दुलंगे अध्यक्ष जवाहर जाजु यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत करून महेश नवमी संबंधित माहिती सांगितली.
यावेळी सोलापूर जिला माहेश्वरी सभा अध्यक्ष जवाहर जाजू, सचिव किरणकुमार राठी, चंद्रकांत तापडिया, गोकुळ झंवर, मधूसुदन कालाणी, गिरीश जाखेटिया, अशोक बाहेती, वेणुगोपाल लडडा, श्रीकांत लडडा, ओमप्रकाश साबु, राजगोपाल सोमाणी, जमनादास भुतडा, मनोज बलदवा, रितेश तापडिया, बाबुशेठ सोनी, श्रीनिवास सोमाणी, विजय जाजू, गोविंद लाहोटी, गोविंद चंडक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्र संचलन किरण राठी यांनी केले तर आभार चंद्रकांत तापडिया यांनी मानले.