खासदार प्रणिती शिंदे ॲक्शन मोडवर, शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी 1 आक्टोंबर रोजी “संग्राम मोर्चा”

सोलापूर : प्रतिनिधी
शेतकरी आणि सर्वसामान्य जनता विरोधी महायुती सरकारच्या विरोधात, महाविकास आघाडीच्या वतीने “संग्राम मोर्चा” मोर्चा आयोजित केला असून आज रोजी शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे खासदार प्रणिती शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर महाविकास आघाडीच्यावतीने खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या दडपशाही आणि शेतकरी विरोधी सरकार विरोधात मंगळवार दिनांक एक ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता भव्य असा संग्राम मोर्चा काढण्यात येणार आहे.
एक ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता चार हुतात्मा पुतळा या ठिकाणापासून मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे या मोर्च्याचे नेतृत्व करणार आहेत.
केंद्रातील भाजपा सरकार आणि राज्यातील महायुती सरकारने सत्तेत येण्यापुर्वी शेतकऱ्यांना विविध आश्वासणे दिली होती. मात्र त्या अश्वसनाची पूर्तता करण्यापासून सरकार अंग काढू भूमिका घेताना दिसून येत आहे. त्यातच वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता आणि शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला. अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच मागील नुकसान भरपाई अद्यापही शेतकऱ्यांना मिळाली नाही. त्यामुळे अस्मानी संकटात सापडलेला शेतकरी आता या जुलमी सरकारच्या निष्क्रियतेमुळे मेटकुटीला आला आहे.
सोलापूर जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबीत आहेत. अनेक प्रश्नावर हा मोर्चा काढण्यात येणार असून सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी, नागरिक बंधु भगिनी, महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सहभाही व्हावे असे आवाहन खासदार प्रणितीताई शिंदे यांनी केले आहे.