काकांना घरात घुसून मारहाण केल्या प्रकरणी भावजाई व पुतण्यांन् विरुद्ध गुन्हा दाखल.

सोलापूर : प्रतिनिधी
बाबू दावलसाब सनदी राहणार मंद्रूप तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर यांनी भावजाई व पुतण्यांन् विरुद्ध स्वतःच्या घरात घुसून मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी सोलापूर न्यायालयात धाव घेतली होती.
घरात घुसून बेदम मारहाण व शिवीगाळ केल्यामुळे बाबू दावलसाब सनदी यांनी सोलापूरच्या न्यायालयात जाऊन कलम १५६ (३) फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ खाली गुन्हा नोंद करण्याकरिता वकील नेमून तक्रार दाखल केली होती.
त्यानंतर मेहरबान कोर्टाने सदर प्रकरणातील वकिलांचा युक्तिवाद ऐकून त्यावर गुन्हा नोंद करण्याचे आदेश पारित केले. फिर्यादी यांच्याकडून ॲड गोविंदा राकेश नारवानी व ॲड कुणाल तूपसाखरे यांनी काम पाहिले.
त्यानुसार आरोपी १) हसनसाब चंदू उर्फ आप्पासाहेब सनदी, २) बेगम चंदू सनदी, ३) अनिस चंदू सनदी (सर्वजण रा. मु. पोस्ट बेळोंडगी तालुका-जत जिल्हा-सांगली) ४) रफिक लाडोबा मुल्ला रा. निंबरगी यांच्याविरूद्ध मंद्रूप पोलिस स्टेशन येथे झालेले न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे भादंवि कलम ४५२,४४८, ३२३, ५०४, ५०६ व ३४ खाली गुन्हा क्र. २७२/२०२४ दिनांक ०१/०८/२०२४ रोजी दाखल झाला आहे.