युवा भिमसेना संघटनेच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रम, महेश डोलारे यांनी अण्णाभाऊंच्या कार्याची दिली माहिती

सोलापूर : प्रतिनिधी
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंती निमित्त युवा भिमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने महापालिका मुलांची शाळा हेडकॉटर अशोक चौक या ठिकाणी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी युवा भिमसेना संस्थापक अध्यक्ष महेश डोलारे म्हणाले, साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे कार्य खूप महान आहे समाज सुधारण्यासाठी अशा महामानवाच्या कार्याचे या जयंती निमित्ताने प्रेरणादायी ठरेल आशा या महामानवाच्या जयंती निमित्त सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
यावेळी प्रमुख उपस्थिती वीरेंद्र जाधव, विकास गायकवाड, मुस्ताक शेख, लिंगाप्पा रामपुरे, स्वाती सुरवसे, कौसर शेख, रेश्मा शिंदे, भाग्यश्री गायकवाड, सुषमा जाधव, पुष्पा धसाडे,
गीता पवार, विद्या पवार, कलीम शेख, किरण लंगशेट्टी, ज्ञानेश्वर पवार, सूरज तूपसुदंर, गीता जाधव आदींसह युवक, महिला उपस्थित होते.