जुळे सोलापूर मध्यवर्ती शिवजन्मोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी अमित भोसले

सोलापूर : प्रतिनिधी
जुळे सोलापूर भागातील गोविंदश्री मंगल कार्यालय येथे जुळे सोलापूर मध्यवर्ती शिवजन्मोत्सव मंडळाची वार्षिक बैठक मराठा सेवा संघाचे प्रशांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व मंडळाचे विश्वस्त शाम कदम, चेतन चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक चेतन चौधरी यांनी केले. या बैठकीत सर्वानुमते जुळे सोलापूर मध्यवर्ती शिवजन्मोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी अमित भोसले यांची निवड करण्यात आली. तर कार्याध्यक्ष कपिल आलाट, उपाध्यक्ष संकल्प जगदाळे, राहुल महाजन, सचिव अभी मोरे, खजिनदार समर्थ चुंबळकर, प्रसिद्धी प्रमुख विश्वनाथ गायकवाड आदींची निवड करण्यात आली.
यावेळी बाळासाहेब पाटील, मारुती गोरे, मकरंद भोसले, नवनाथ कदम, सुभाष कदम, वामनराव भोसले, विठ्ठल गरड, अजित घुगे, ईश्वर स्वामी, रविकांत उबाळे, अजित डोके, राहुल माने, विनय देशपांडे, नवनीत कुलकर्णी, निलेश डांगे, नागेश जाधव, विजय सागर, प्रकाश माळगे आदी उपस्थित होते.