51 मित्रांनी उमेश मस्के यांच्या आठवणींना उजाळा देत केले रक्तदान, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेकांची उपस्थिती

सोलापूर : प्रतिनिधी
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांच्या मार्गदर्शना खाली सोलापूर शहरात पक्ष वाढण्याचे काम तात्कालीन शहराध्यक्ष आणि बहुजन विकास सामाजिक संस्थेचे संस्थापक स्वर्गीय उमेश मस्के यांनी उत्तम प्रकारे केले.
त्यावेळेस त्यांनी राजकारण विरहित मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य केले. मोठ्या संख्येने मित्रपरिवार जमवला परंतु नियतीचा खेळ वेगळाच होता. उमेश मस्के यांच्या आकस्मित जाण्याने कुटुंबीय, मित्रपरिवार आणि पक्षावर मोठा आघात झाला. यातून सावरत कुटुंबीय आणि मित्रपरिवाराने त्यांच्या सामाजिक कार्याची जपणूक करत ते कार्य पुढे चालू ठेवले आहे.
यात त्यांचे बंधू निलेश मस्के यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) आणि बहुजन विकास सामाजिक संस्थेमार्फत त्यांच्या विचाराने सामाजिक काम पुढे सुरू ठेवले आहे.
उमेश मस्के यांच्या द्वितीय पुण्यतिथी निमित्त त्यांच्या बहुजन विकास सामाजिक संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी 51 रक्तदात्यांनी रक्तदान करून उमेश मस्के यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी दिलेल्या विद्यार्थी, युवक, महिला, कामगार, श्रमिक, यासह अनेक लढ्यातील साक्षीदार मित्रांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
या वेळी मातंग समाजाचे अध्यक्ष सुहास शिंदे, RPI (A) जिल्हाध्यक्ष शांतीसागर सरवदे, रोहित खिलारे, निलेश मस्के यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
तसेच अजिंक्य कांबळे, लक्ष्मण खाडे, अक्षय सोरटे, सुरज देवकर, चिकू बनसोडे, आकाश कांबळे, विशाल भोसले, नितीन मस्के, शुभम चव्हाण, हर्षल मस्के, अक्षय घाटे, यांनी रक्तदान शिबिरासाठी परिश्रम घेतले.