मोची समाजाचे शिष्टमंडळ सुशिलकुमार शिंदे यांच्या भेटीला, मोची समाजाला मध्य विधानसभा उमेदवारीची केली मागणी

सोलापूर : प्रतिनिधी
आगामी २०२४ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील २४९ सोलापूर शहर मध्यची जागा ही मोची समाजाला मिळावी या करिता काँग्रेस प्रेमी मोची समाज शिष्टमंडळ वतीने मोची समाजाचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र भंडारे यांच्या नेतृत्वाखाली माजी केंद्र गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे यांच्या कडे मागणी केली.
यावेळी देवेंद्र भंडारे म्हणाले, गेल्या कित्येक वर्षा पासून मोची समाज हा काँग्रेस पक्षासोबत एकनिष्ठा असून आत्तापर्यंत विधानसभेला जे कोणाला उमेदवार देईल त्यांचा सोबत निष्ठेने काम करून त्यांचा विजयात मोची समाजाचा सिहांचा वाटा असतो. यावेळी प्रणिती शिंदे हे खासदार झाल्यामुळे ही जागा मोची समाजाला द्यावा, मोची समाजाला संधी दिली तर आम्ही सर्वजण एक दिलाने काम करून निवडून आणू असे मागणी केले.
यावेळी माजी महापौर संजय हेमगड्डी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव प्रा.नरसिंह आसादे, सोलापूर शहर काँग्रेस कार्याध्यक्ष हणमंतु सायबोळू, सोलापूर शहर युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष अंबादास करगुळे, माजी नगरसेवक सिद्राम अट्टेलुर, परिवहन माजी सभापती बसवराज म्हेत्रे, जनरल सेक्रेटरी सिद्राम कामाटी, काँग्रेस कमिटीचे बी ब्लॉक अध्यक्ष बाबुराव म्हेत्रे, शिक्षण मंडळ माजी सदस्य यल्लाप्पा बुगले, उपाध्यक्ष दिनेश म्हेत्रे, नागनाथ कासोलकर, बाबू विटे, विभागीय अध्यक्ष शिवराम जगले, अर्जुन साळवे, ईश्वर म्हेत्रे, काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नागेश म्हेत्रे, माजी रथोत्सव अध्यक्ष अशोक सायबोळू, आनंद पल्लेलु, अंबादास नाटेकर, बानप्पा कंपली आदी उपस्थित होते.