प्रणिती शिंदेचे अभिनंदन, मतदारांचे मनापासून आभार, जिल्ह्यातील कोणतेही प्रश्न, अडचणी सोडवण्यासाठी मी कटिबद्ध : राम सातपुते (आमदार)

सोलापूर : प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी आणि एनडीए यांच्या कामांवर विश्वास दाखवत मला मत देणाऱ्या सोलापूरमधील 5 लाख 46 हजार मतदार बंधू-भगिनींचे मी मनापासून आभार मानतो. सोलापूरकरांनी माझ्यावर दाखवलेला हा विश्वास खरोखर भारावून टाकणारा आहे. अतिशय अल्पावधीत सोलापूरकरांनी दिलेलं हे उदंड प्रेम माझ्यासाठी नक्कीच खूप महत्त्वाचं आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या उमेदवाराचे अभिनंदन, या निवडणुकीत माझ्यासाठी अतिशय मेहनत घेऊन काम केलेल्या महायुतीमधील सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानतो. तसेच सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या कामावर विश्वास ठेवत मला सोलापूर लोकसभेची उमेदवारी दिली, त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाचा देखील मनापासून आभारी आहे.
सोलापूरकरांशी असलेले माझे हे ऋणानुबंध असेच कायम राहतील. सोलापूर जिल्ह्याचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच कटिबद्ध आहे आणि आपले कोणतेही प्रश्न, अडचणी घेऊन येणाऱ्या सोलापूरच्या मायबाप जनतेसाठी मी नेहमीच उपलब्ध असेल, त्यांच्या सेवेत मी नेहमीच कार्यरत आहे, अशी ग्वाही मी या निमित्ताने देऊ इच्छितो. पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार मानत आमदार राम सातपुते यांनी पत्रक काढले आहे.