जाहिर निषेधच.. धाराशिवचे अप्पर पोलीस अधिक्षक हसन गौहर यांनी पत्रकाराला केली धक्काबुक्की, सर्व स्तरातून निषेध होतोय व्यक्त

सोलापूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन दिवस सोलापूर शहर जिल्हा दौऱ्यावर होते. सोलापुरातील दौरा संपल्यानंतर त्यांनी धाराशिव दौऱ्यासाठी गेले. तेथे मनसेच्या पदाधिकाऱ्यां समवेत आढावा बैठकीचे नियोजन केले होते.
सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा विषय ज्वलंत असताना मराठा समाजाच्या भावना आरक्षणाविषयी तीव्र आहेत. हे माहीत असताना देखील राज ठाकरे यांनी मागील दोन-तीन ठिकाणी आरक्षणाची गरज नाही असे वक्तव्य केले. धाराशिव येथे राज ठाकरे मुक्कामी असणाऱ्या खाजगी हॉटेलमध्ये मराठा बांधवांनी आंदोलन करत घोषणा दिल्या. या आंदोलकाची बातमी करण्यासाठी विविध माध्यम प्रतिनिधी तेथे हजर होते याचे चित्रीकरण करत होते.
त्या वेळेस धाराशिवचे अपर पोलीस अधिक्षक हसन गौहर आणि त्यांची टीम तेथे हजर होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची जबाबदारी त्यांच्यावर होती ते न करता लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखणारा पत्रकार प्रामाणिकपणे आपली बातमी कव्हर करत होते. त्यांनी सर्वांना बाहेर काढले, बाहेर काढताना त्यांची भाषा ही उर्मट उद्धट अर्वाच्य होती. सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे सरचिटणीस तथा TV9 मराठीचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांना धक्काबुक्की करत आंदोलनाची बातमी करण्या पासून रोखत त्यांना बाहेर काढले. परंतु सागर सुरवसे त्यांना म्हणत होते आपली भाषा व्यवस्थित ठेवा परंतु पोलीस हसन गौहर यांची ऐकण्याची मानसिकता नव्हती ते आपल्या तोऱ्यात बोलत राहिले. पहा व्हिडिओ जसा आहे तसा..
अखेर तेथे उपस्थित असणाऱ्या सर्व इलेक्ट्रॉनिक मिडिया, प्रिंट मिडिया, सोशल मिडिया पत्रकारांनी या घटनेचा जाहीर निषेध नोंदवला. याची माहिती कळताच सोलापुरात देखील पत्रकार संघटना, पत्रकार, विविध संस्था, संघटना, प्रतिष्ठान यांच्या कडून या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत आहे.