शरद पवारांनी सोलापुरातील युवकाला दिली मोठी ताकद, थेट कोल्हापुरातील कागल विधानसभा मतदारसंघाचे केले निरीक्षक, निवडी नंतर चर्चेला उधाण

सोलापूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या मान्यतेने व राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासाठी आजवर आपण दिलेलं योगदान लक्षात घेऊन हर्षल प्रधान यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासाठी निरीक्षक २७३ कागल विधानसभा कोल्हापूर जिल्हा पदावर नियुक्ती करण्यात आली.
पक्षाची संघटनात्मक बांधणी उत्तमरित्या करून पक्ष मजबूत करण्यासाठी सर्व शक्तीनिशी योगदान द्याल असा ठाम विश्वास हर्षल प्रधान यांच्या बद्दल पक्षाला वाटतो. समाजातील सर्व घटकांना सोबत घेउन पक्षाची ध्येय-धोरणे तसेच पक्षाचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचे विचार सर्वदूर पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहाल अशी अपेक्षा नियुक्ती केलेल्या पत्रातून व्यक्त केली आहे.
या निवडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि युवकचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांचे राष्ट्रवादीचे युवा नेते हर्षल प्रधाने यांनी आभार मानत दिलेली जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडू असा विश्वास व्यक्त केला.