“आमचं ठरलंय” लक्ष शहर उत्तर विधानसभा 2024, शहर उत्तर मध्ये लागले बॅनर, बंडाचा सामना आमदार विजयकुमार देशमुख यांना करावा लागणार.?

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर लोकसभेनंतर आता वेध लागले आहेत विधानसभा निवडणुकीचे, त्या अनुषंगाने सोलापूर शहर जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची तयारी आपापल्या परीने विद्यमान, माजी, इच्छुक उमेदवार करत आहेत. नेहमी चर्चेत असतो तो शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ, हा मतदारसंघ पूर्वीचा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो परंतु आमदार विजयकुमार देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मागील चार टर्म पासून भाजपला लीड देत हा बालेकिल्ला आता भाजपचा झाला आहे हे सिद्ध केले.
शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजपमधून निवडणूक लढवण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत असे दर टर्मला होते परंतु अखेरीस काय होते हे सर्वांना माहीतच आहे, यंदाच्या वेळी देखील भाजप पक्षांतर्गत शहर उत्तर मध्ये बंडाळी उफाळून आले असून अनेक ठिकाणी आमच ठरलंय असे बॅनर दिसून येतात. भाजपचे नेते चन्नविर चिट्टे यांचा त्या बॅनर फोटो असून आमचं ठरलंय लक्ष सोलापूर शहर उत्तर विधानसभा 2024, आपला माणूस हक्काचा माणूस, विधानसभा आणि भाजपच कमळाचे चिन्ह देखील त्या डिजिटल बॅनर वर दिसून येते. डिजिटल वरील फोटो जरी चिट्टेचा असला तरी त्यांच्या सोबत असणारे कोण भाजपमधील आहेत, यासह त्यांना पाठिंबा देणारे शहरातील, राज्यस्तरावरील कोण आहेत पक्षाकडून यांना उमेदवारी मिळणार.? येणाऱ्या काळात हे खरंच बंडखोरी करून भाजपच्या अधिकृत उमेदवार विरोधात उभारणार हे काळ वेळ ठरवेल.
दरवेळी विधानसभा निवडणुकीत शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात अनेक बंडाळ्या उभारतात, भाजपवर आणि आमदार विजयकुमार देशमुख यांच्यावर दबाव आणतात परंतु अखेरीस मात्र हे बंड मोडीत निघून पुन्हा एकदा पक्षाचा आदेश मान्य आहे असं म्हणत, भाजपचं काम करतात. हा मागील दोन टर्मचा अनुभव शहर उत्तरला माहीत असल्याचं कार्यकर्त्यां मधून बोललं जातं.