सोलापूरक्राईममहाराष्ट्रसामाजिक

उमा पवार खुन खटला पतीचा जामीन अर्ज नामंजुर

सोलापूर : प्रतिनिधी

25 ऑगस्ट 2023 रोजी करमाळा येथे घडलेल्या उमा पवार हिच्या खुन प्रकरणात अटक असलेला तिचा पती प्रफुल्ल विठ्ठल पवार रा. करमाळा याने दाखल केलेल्या जामिन अर्जाची सुनावणी बार्शी सत्र न्यायालयाचे न्यायाधिश विक्रमादीत्य मांडे यांच्या समोर होऊन न्यायाधिशांनी आरोपी पतीचा जामीन अर्ज नामंजुर केला.

आरोपी व्यसनाधिन असल्यामुळे उमा हिचा भाऊ फिर्यादी दादासाहेब चव्हाण रा. मोहोळ याने बहिणीची मुले हुशार असल्यामुळे त्यांच्या अभ्यासावर परिणाम होऊ नये म्हणुन बहिणीचा मुलगा महेश यास मोहोळ येथे शिक्षणासाठी आणले होते. त्याचा राग मनात धरुन पती प्रफुल्ल पवार याने पत्नी उर्मिला हिचा डोकीत वजनदार दगडी वरवंट्याने डोक्यात मारुन खुन केला व तिने आत्महत्या केली असा बनाव करुन तिच्या प्रेताला गळफास दिला, या आरोपावरुन करमाळा पोलिसांनी आरोपीस अटक करुन न्यायालयात दोषारोप पत्रक दाखल केले आहे.

आरोपीने न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जास मुळ फिर्यादी दादासाहेब चव्हाण याने न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करुन प्रखर विरोध केला होता. सरकारी वकील दिनेश देशमुख यांनी आपल्या युक्तिवादात वैद्यकीय पुराव्यावरुन उमा हिचा मृत्यु आत्महत्येमुळे झाला नसुन खुनामुळे झाला आहे. आरोपीने पत्नीचा निर्घृणपणे खून केल्यामुळे त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा असा युक्तिवाद केला. न्यायाधिशांनी आरोपीचा जामिन अर्ज फेटाळून लावला.

या प्रकरणात सरकारतर्फे ॲड. दिनेश देशमुख, मुळ फिर्यादी मयताच्या भावातर्फे ॲड. जयदीप माने, ॲड. शरद झालटे, ॲड. रियाज शेख (मोहोळ) तर आरोपीतर्फे ॲड. एन. टी. पाटील यांनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!