सोलापूरमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

स्वयं सहाय्यता गटातील महिलांनी केला सोलापूर शहर स्वच्छ करण्याचा निर्धार

सोलापूर मनपा, घनकचरा व्यवस्थापन विभाग व DAY NULM विभागाचा उपक्रम

सोलापूर : प्रतिनिधी

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शहर स्वच्छ व सुंदर करण्या करिता महिलांनी पुढाकार घेऊन आपले घर व आपले परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी घ्यावी, तसेच स्वयं सहाय्यता गटातील सर्व महिलांना या अभियानात सामावून घ्यावे असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी सोलापूर मनपा मार्फत आयोजित महिला मेळाव्यात केले.

सोलापूर मनपा, स्वच्छता विभाग व DAY NULM विभागाचा च्या वतीने महापालिकेतील यशवंतराव सभागृह येथे शहरातील महिला बचत गटाच्या अध्यक्ष व सचिव यांची प्राथमिक बैठक आयोजित करणेत आली. सदर बैठकीमध्ये महापलिकेच्या वतीने दि.०२ डिसेंबर २०२४ ते १२ डिसेंबर २०२४ या कालावधीमध्ये विशेष स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आलेले आहे. सदर मोहिमेमध्ये महिला बचत गटांचा सहभाग हि महत्वाचा आहे. त्यामुळे सदर महिला बचत गटांना सदर मोहिमेमध्ये सहभागी होण्याचे आव्हान करणेत आले.

या बैठकीमध्ये बचत गट महिलांकडून शहरातील स्वच्छतेबाबत अभिप्राय घेणेत आले व त्यामध्ये सुधारणा होईल असा आराखडा तयार करणे बाबत चर्चा करणेत आली. यासोबत ज्या बचत गट महिला कापडी पिशव्यांचा उत्पादन करतात. अशा बचत गटांना व्यापारी संघटनेसोबत म.न.पा.मार्फत जोडून देणेत येईल. त्यामुळे शहरातून प्लास्टिकचा उपयोग कमी करणेस मदत होईल. अतिरिक्त आयुक्त रवि पवार यांनी बचत गट महिलांसमोर RRR या संकल्पनेची माहिती दिली. या RRR सेंटर मध्ये ज्या नागरिकांकडे वापरात नसलेले कपडे, खेळणी, भांडे, उपकरणे इत्यादी असतील त्या नागरिकांनी या RRR सेंटरमध्ये सुपुर्द करू शकतील. हे जमा केलेलं साहित्य या बचत गट महिलांकडून नूतनीकरण करून वापरणे योग्य करून जे गरजू लोक आहेत त्यांना ते वापरण्यास देता येईल.

यामध्ये खाजगी संस्थेकडून CSR फंड जमा करून त्या बचत गट महिलांना प्रत्येक वस्तूप्रमाणे उत्पन्न होईल अशा प्रकारची संकल्पना आखण्यात येत आहे. सदर बैठकीमध्ये साधारण २०० ते २५० बचत गटांच्या अध्यक्ष व सचिव व प्रतिनिधीची उपस्थिती होती.

सदरील मेळावा मनपा आयुक्त शीतल तेली उगले यांचे मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त आयुक्त रवि पवार, शहर प्रकल्प अधिकारी तेमुर मुलाणी, सहा.आयुक्त शशिकांत भोसले यांचे मार्गदर्शना खाली आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्य सफाई अधिक्षक नागनाथ बिराजदार, सफाई अधिक्षक अनिल चराटे, शहर अभियान व्यवस्थापक समीर मुलाणी, सर्व समुदाय संघटक, तसेच शहरातील सर्व मुख्य आरोग्य निरीक्षक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!