
सोलापूर : प्रतिनिधी
वक्फ बोर्ड हटवा देश वाचवा, असे म्हणत वक्फ बोर्डच्या जुलमी कायद्यामुळे साखर पेठमधील हिंदु कुटुंबियांचे पलायन रोखण्यासाठी पिडीत हिंदु कुटुंबियांचे महापालिका प्रवेशद्वार समोर साखळी उपोषण आंदोलन करण्यात येत आहे.
साखर पेठ वक्फ बोर्डच्या जुलमी कायद्यात अडकला आहे त्यातील हिंदूना न्याय मिळालाच पाहिजे, वक्फ बोर्डच्या जुलमी कायद्यामुळे हिंदू कुटुंबांना बांधकाम परवानगी मिळाली पाहिजे, साखर पेठ सोलापूर येथील वक्फ बोर्डच्या जुलमी कायद्यामुळे पीडित हिंदू कुटुंबांच्या घरांची झालेल्या अत्यंत दुरवस्था रोखावी, वक्फ बोर्डच्या जुलमी कायद्यामुळे पीडित हिंदू कुटुंबांना वाटते आपण पाकिस्तानात राहत आहोत का?
इतका दररोज त्रास, अन्याय करुन पिण्याचे पाणी सुद्धा त्यांना जिहादी वृत्तीच्या लोकांकडून मिळू दिले आत नाही, मग सदर वक्फ बोर्डच्या जुलमी कायद्यामुळे पीडित हिंदू कुंटुंबांचे वर्षानुवर्षे पलायन होत आहे याला जबाबदार प्रशासनाने अद्याप पर्यंत काय केले? असा सवाल बॅनरच्या माध्यमातून विचारला आहे.
वक्त बोर्डाच्या नावाखाली हिंदू बांधवांना त्रास देणाऱ्या संबंधित ट्रस्टवर कायदेशीर कारवाई करावी आणि महापालिकेने बांधकाम परवाना द्यावा यासाठी साखर पेठेतील हिंदू बांधव आपल्या घरगुती साहित्यासह आंदोलनात सहभागी झाले. यावेळी उपस्थित महिलेने सर्वांना चहा आणि जेवणाची व्यवस्था जागेवरच केल्याचे पहावयास मिळालं.
साखर पेठ सोलापूर येथील वक्फ बोर्डच्या जुलमी कायद्यामुळे केवळ हिंदु पिडीत कुटुंबानाच वक्फ बोर्डच्या माध्यमातुन नोटीस देणारे हाषमफीर ट्रस्ट चा जाहिर निषेध केला. साखर पेठ मधील वक्फ बोर्डाच्या 281 साखर पेठ मधील बेकायदा बांधकामे कधी जमीनदोस्त करणार? लाखो रूपये थकबाकी असणारे, हिंदू मुस्लीम म्हणून जातीय तेढ निर्माण करणार्या हाशमपौर ट्रस्टी वर कार्यवाही कधी करणार? साखर पेठ सोलापूर वक्फ बोर्डच्या जुलमी कायद्यामुळे मुस्लिमांची बेकायदा पक्की बांधकामे कधी पडणार असा सवाल देखिल स्थानिक नागरीक विचारत आहेत.
यावेळी हिंदू महासभेचे शहराध्यक्ष सुधाकर बहिरवाडे, चंद्रशेखर गडगी, दत्तात्रय सारंगी, महेश आगनूर, मल्लिकार्जुन म्हता, सरीता म्हता, तुळजाबाई जिल्हा, सुप्रिया मुमुडले, शिवशंकर म्हता, संगिता आगणुर, अंबुबाई म्हता, पुरुषोत्तम वग्गा, नामदेव सारंगी, शुभम मिट्ठा, उमेश जिल्हा, गणेश गुज्जा, अशोक गडगी, सवित्राबाई तुम्मा, आणि साखर पेठेतील अनेक हिंदू कुटुंबीय या साखळी आंदोलनात उपस्थित आहेत.