
सोलापूर : प्रतिनिधी
परभणी घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बंद पुकारण्यात येत असून मोर्चे देखील काढण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून सोलापूर शहरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट, बहुजन समाज पार्टी, युवा भीमसेना यासह विविध संघटना पक्षाच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
दरम्यान, सोलापूरहुन साताराकडे जाणाऱ्या तसेच सोलापूरहून शिवाजीनगर पुणे आणि तुळजापूर हून सोलापूरकडे येणाऱ्या या तिन्ही एसटी बसेसवर अज्ञातांनी दगडफेक केली. या दगडफेकी मध्ये एसटीच्या काचा फुटल्या. सोलापूर – सातारा या एसटी बसेसला सम्राट चौक येथे तर सोलापूर – पुणे आणि तुळजापूर – सोलापूर या बसला डी मार्ट येथे लक्ष करण्यात आले.
पोलीस बंदोबस्तात इतर बसेस सोडण्यात आल्या.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, एस टी महामंडळा च्या अधिकाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना पाचारण केले. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पंचनामा करून सदरच्या बसेस पोलीस बंदोबस्तात मार्गस्थ झालेल्या आहेत. त्यानंतर सोलापूर बस स्टॅन्ड वर आणि एसटी सोबत पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. पोलीस याबाबत अधिक माहिती घेत आहेत.
उत्तम जुंदळे, आगार व्यवस्थापक सोलापूर आगार.