सोलापूर महानगर पालिकेमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 27 अधिकारी व कर्मचारी यांचा झाला सन्मान, आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केले कौतुक

सोलापूर : प्रतिनिधी
15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आज महापालिका इंद्र भवन येथे महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर तंबाखू मुक्तीची शपथ तसेच तिरंगा प्रतिज्ञा यावेळी घेण्यात आली. प्रतिवर्षा प्रमाणे सोलापूर महानगर पालिकेमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अशा 27 अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान यावेळी महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या हस्ते करण्यात आले.
यामध्ये महापालिकेचे उपयुक्त आशिष लोकरे, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, उपअभियंता नीलकंठ मठपती, सहा अभियंता रामचंद्र पेंटर, विभागीय अधिकारी नंदकुमार जगधने, सहा. अभियंता प्रकाश दिवानजी, सफाई अधीक्षक अनिल चराटे, वैद्यकीय अधिकारी मंजरी कुलकर्णी, अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी सामान्य प्रशासन विभागाचे कार्यालय अधीक्षक लक्ष्मीनारायण दोंतुल, बांधकाम विभागाचे अवेक्षक शकील शेख, जनसंपर्क अधिकारी श्रीगणेश बिराजदार तसेच आयुक्त यांच्या कार्यालयातील स्टेनोग्राफर परमेश्वर सुळगावकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान महापालिकेच्या आयुक्त शितल तेली उगले यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या ध्वजारोहण कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त मच्छिंद्र घोलप, उपायुक्त आशिष लोकरे, उपायुक्त तैमुर मुलांणी, मुख्य लेखा अधिकारी रत्नराज जवळगेकर, मुख्य लेखापरीक्षक रूपाली कोळी, सहाय्यक आयुक्त ज्योती भगत-पाटील, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सहाय्यक,
आयुक्त गिरीश पंडित, उपसंचालक नगररचना मनीष भिष्णुरकर, नगर सारिका अकुलवार, अग्निशामक विभाग प्रमुख राकेश साळुंखे, सार्वजनिक आरोग्य अभियंता वेंकटेश चौबे, सहा. कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी नितीन साके यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगर सचिव प्रवीण दंतकाळे यांनी केली.