पालिका आयुक्त लक्ष देतील का.?, स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा तर दुसरीकडे समस्यांच्या विळख्यात नागरिक अडकले
बालाजी मूकबधिर व मतिमंद शाळेत दिव्यांग विद्यार्थ्यांना माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या हस्ते गणवेश वाटप

सोलापूर : प्रतिनिधी
मुमताज नगर कुमठा नाका येथील बालाजी मूकबधिर व मतिमंद शाळेत 78 वा स्वातंत्र्य दिनानिमित्त नगरसेविका सौ.राजश्री अनिल चव्हाण यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, मिठाई-खाऊ वाटप करण्यात आले. प्रारंभी भारत मातेच्या प्रतिमेचे पुजन करून ध्वजारोहण करून राष्ट्रगीत म्हणण्यात आले.
त्यामुळे शाळेच्या आवारात उत्साहाचे वातावरण दिसून आले होते. अध्यक्षस्थानी श्री स्वामी समर्थ अपंग सेवा मंडळ सोलापूरच्या सचिव लक्ष्मीबाई इटकर या उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श नगरसेविका पुरस्कार विजेत्या राजश्री अनिल चव्हाण व भाजपा शहर महिला आघाडी सरचिटणीस गीता पाटोळे यांना सन्मानित करण्यात आले होते.
त्यावेळी उपस्थित शिक्षक वर्ग यांनी आपले मनोगत व्यक्त केले की नगरसेविका सौ राजश्री चव्हाण यांचे कार्य उत्तम असून ते प्रभागातील नागरिकांच्या समस्या प्रामुख्याने सोडवतात व सतत महापालिके त शासन दरबारी पाठपुरावा करून नागरिकांच्या सोयीसुविधासाठी नेहमी प्रयत्नशील असतात विशेष म्हणजे त्यांचा नगरसेवकाचा कार्यकाल संपलेला असताना सुद्धा सतत नागरिकांच्या समस्यां सोडवण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यांनी बालाजी मूकबधिर शाळा येथे आज सकाळी 78 वा स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना गणवेश व मिठाई खाऊ वाटप करून सहकार्य केल्याबद्दल त्यांचे संपूर्ण शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
त्या प्रसंगी संस्था सदस्य श्रीनिवास इटकर, मुख्याध्यापक शामराव वाघमारे, अरविंद कुलकर्णी, इरफान चौधरी, विद्यार्थ्यांना सुखरूप सेवा देणारे रिक्षा चालक अशोक गुत्तीकोंडा, कटारे, रेहमान, त्याचबरोबर पालक वर्ग दिव्यांग विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान चौगुले यांनी तर आभार सुरेश इटकर यांनी मानले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालाजी दिकोंडा, पवार सर, साळुंखे सर, जमादार सर, यांनी परीश्रम घेतले आहे.
एकीकडे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना दुसरीकडे मात्र अद्याप नागरिक समस्या संपल्या नसल्याचे चित्र पहावयास मिळालं. पालिका आयुक्त शितल तेली उगले हे प्रभाग 26 मधील गणेश बिल्डर सोसायटी कडे लक्ष देतील का.? असा सवाल स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला.
गटारी तुंबले आहेत पावसाचे पाणी आल्याने लोकांच्या घरात पाणी जात आहे. लहान मुले आबाल वृद्ध यांचे अतोनात हाल होत आहेत. घरात सरपटणारे प्राणी साप, बेडूक येत आहेत. त्यामुळे तेथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहेत. नरक यातना भोगत आहेत एकदा पालिका आयुक्त यांनी समक्ष पाहणी केल्यानंतर समजेल की हे रहिवासी सोलापूर शहरात राहतात की जंगलात याचा तुम्हाला अनुभव येईल.
स्थानिक नागरिक शंभर टक्के टॅक्स भरून त्यांना असंख्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या नागरिकांच्या समस्या दूर कराव्यात अशी मागणी भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी केली आहे.