सोलापूरमहाराष्ट्रराजकीयसामाजिक
पालिकेतील लाड कमिटी वारस हक्क अंतर्गत 59 उमेदवारांना दिले नियुक्ती आदेश

सोलापूर : प्रतिनिधी
शासन निर्देशानुसार पालिका आयुक्त शीतल तेली -उगले यांच्या मान्यतेने महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर महानगरपालिकेतील लाड कमिटी वारस हक्क अंतर्गत सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने बिगारी/ झाडूवाली असे 59 उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत.
त्यामध्ये सफाई कामगार 9, झाडूवाली 35, बिगारी 14, ड्रेनेज मजूर 1 या उमेदवारांचा समावेश असून त्यांना नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत. सोलापूर महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने आतापर्यंत एकूण 173 उमेदवारांना नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहे. अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.