सोलापूरराजकीय

“जिहादी लांडे” असे संबोधित करुन दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या देवेंद्र कोठे यांच्यावर कारवाई करा : अझहर हुंडेकरी (माजी नगरसेवक)

MIM पक्षाच्या वतीने पोलीस आयुक्तांना निवेदन, शहरातील शांतता, सुव्यवस्थता कायम ठेवावी, तात्काळ गुन्हे दाखल करुन अटक करा : MIM पक्षाची मागणी

सोलापूर : प्रतिनिधी

आदर्श आचार संहितेचा उल्लंघण करुन प्रक्षोभक व चिथावणी खोर भाषण करुन दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करुन दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण करणाऱ्या देवेंद्र कोठे व सभेचे आयोजक यांच्यावर गुन्हे दाखल करावे या मागणीसाठी MIM पक्षाच्या वतीने पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले.

सोलापूर लोकसभेची निवडणूक व आदर्श आचार संहितेमध्ये काल दिनांक ०१/०५/२०२४ रोजी योगी आदित्यनाथ यांचे सभेमध्ये देवेंद्र कोठे यांनी मुस्लिम समाजास टार्गेट करुन “जिहादी लांडे” असे संबोधित करुन दोन समाजामध्ये तेढ निर्माण केलेले आहे व हिरवे भगवे असे जातीय रंग देवून शहराची शांतता व सुव्यवस्थता वारंवार धोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. वारंवार होणाऱ्या शहर व जिल्ह्यात जातीय तणावाच्या घटनांना हेच कारणीभूत आहेत व शहरातील सामान्य जनता दहशती खाली आहे.

निवडणुक आयोग यांच्या व पोलीस विशेष शाखा यांच्या कॅमेऱ्यामध्ये त्यांच्या भाषणाची क्लिप तपासल्यास याचा उलगडा होईल. सदरील बाब शहरातील सर्व न्यूज चैनल मध्ये प्रसारीत झालेली आहे व शहरात तनावाचे सोलापूर वातावरण निर्माण झालेले आहे. मुस्लिम तुष्टीकरणावर हल्ला करण्याची रणनीती आखण्यात आलेली आहे, जेणेकरुन हिंदु मतदार मतदानासाठी घराबाहेर पडतील.

मुस्लिम समाजामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करुन मुस्लिम समाज हा मतदानासाठी बाहेर येऊ नये, यासाठी कटकारस्थान करत आहेत. सध्या प्रचारासाठी टी. राजासिंग, राणे यांना शहरात बोलवून जातीय दंगल घडविण्याचा प्रयत्न सुरु आहे. मागच्या वेळेस सदरील व्यक्तींमुळे शहरामध्ये दगडफेक झालेली होती, पोलीसांच्या दक्षतामुळे शहरात दंगल घडण्याचा यांचा प्रयास विफल झाला. आदर्श आचार संहितेमुळे निवडणुक ही शांततेत पार पडावी म्हणून सदरील व्यक्तींवर शहरामध्ये बंदी घालण्यात यावी.

तरी सदरील व्यक्तीवर व कार्यक्रमाच्या आयोजकांवर तात्काळ गुन्हे दाखल करुन अटक करण्यात यावी व शहरातील शांतता, सुव्यवस्थता कायम ठेवावी, अशी विनंती MIM पक्षाच्यावतीने मागणी केली आहे.

निवेदन देते वेळी माजी नगरसेवक अजहर हुंडेकरी, गाजी जहागिरदार, सजासर बागवान, शोएब चौधरी, अब्दुल्ला डोणगांवकर, एजाज अहमद बागवान, अशपाक बागवान, इलियास शेख, हारीस कुरेशी, मच्छिंद्र लोकेकर, के. के. राजा उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!