समाजाचा कचरा गोळा करणाऱ्या हातांवर राखी बांधून आस्था टिमने जोपासली माणुसकी
रक्षाबंधन ओवळणी म्हणून व्यसनमुक्त व्हावा स्वतःची व कुटुंबाची काळजी घेण्याची केली मागणी

सोलापूर : प्रतिनिधी
यंदाही अश्या संदेशपुर्ण रक्षाबंधन आस्थाच्या महिला सभासदांकडून सोलापुर महानगर पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन कर्मचाऱ्यां सोबत साजरा केला गेला. रक्षाबंधन हा हिंदूंचा एक लोकप्रिय वार्षिक सण आहे, जगाच्या इतर भागांमध्ये विशेषतः हिंदू लोकांद्वारे साजरा केला जातो.
या दिवशी सर्व वयोगटातील बहिणी त्यांच्या भावांच्या मनगटाभोवती राखी म्हणजे एक पवित्र आणि आकर्षक दोर विधिवत बांधतात. ही राखी त्यांच्या भावांकडून त्यांचे रक्षण करण्याचे प्रतीक मानले जाते. परंपरेनुसार राखी बांधल्यानंतर भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो.
परंतु आस्थाच्या महिला सभासदांकडून राखी बांधून घेतल्यानंतर त्यांनी व्यसनमुक्त जीवन जगाव स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्याव हे वचन घेतल ओवाळणी केली.
रक्षाबंधन हा श्रावणातील प्रमुख सण आहे. यामध्ये बहिणी आपल्या भावाला राखी बांधतात. रक्षाबंधन हा हिंदू दिनदर्शिकेतील श्रावण महिन्यात साजरा केला जातो, जो सामान्यतः ऑगस्टमध्ये येतो. रक्षाबंधन ह्याचा शब्दशः संस्कृत अर्थ “संरक्षण, बंधन किंवा काळजी” असा होतो. बहीण-भावाचा हा सण, ज्याचा उगम लोक-संस्कृतीमध्ये झाला, त्याला स्थानानुसार वेगवेगळी नावे होतात राकरी असे ही म्हणटले जात होते.
रक्ताचे नाते नसलेल्या स्त्रिया आणि पुरुषांमध्ये स्वैच्छिक नातेसंबंधांची एक बदललेली परंपरा देखील आहे. यासाठी जाती आणि वर्गाच्या पलीकडे तसेच हिंदू आणि मुस्लिम हा भेद विसरून राखी बांधली जात आहे. आस्था फाऊंडेशन संचलित आस्था रोटी बँकेच्या महिला सभासदांनी ज्यामध्ये निलिमा हिरेमठ, कांचन हिरेमठ, छाया गंगणे, संपदा जोशी, नीता अकुर्डे, संगिता छंचुरे, अनिता तालीकोटी, स्नेहा वनकुद्रे, स्नेहा मेहता, सुवर्ण पाटील, अविनाश माचारला, हबीब आश्रम चे व्यवस्थापक बेले मॅडम तर कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी आस्थाचे सर्वेसर्वा विजय छंचुरे,पुष्कर पुकाळे यांनी परिश्रम घेतले.
महानगरपालिकेच्या वतीने आस्था टीमचे आभार व्यवस्थापकिय अधिकारी अशोक चराटे व केदारनाथ गोटे यांनी तर सोरेगाव हबीबा अनाथ अश्राममधील सर्व मुलांना आस्थाच्या महिला सभासदांकडून राखी बांधून चांगले शिकून स्वतःच्या पायावर उभे राहा, स्वतःच पर्यायाने समाजाचे देशाचे नाव मोठ करा यशस्वी व्हा अश्या आपुलकीने संस्कार मोती दिले. राखी बांधून खाऊ वाटप करण्यासाठी उपस्थित होत्या.
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पेशंट व नातेवाईकांना राखी बांधण्यात आली आहे. तसेच हबीब आश्रम मधील अनाथ मुलांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा करण्यात आले आहे.