म्हेत्रे-कल्याणशेट्टी यांनी एकरूख उपसा सिंचन योजनेच्या अंतिम टप्याचे श्रेय घेऊ नये, बाळासाहेब मोरेची टिका

सोलापूर : प्रतिनिधी
स्व. आ. बाबासाहेब तानवडे यांच्या दूरदृष्टीतून व अथक परिश्रमातून लोकनेते स्व. ब्रम्हानंद मोरे यांच्या मागणी निवेदनावरुन दिनांक २९ डिसेंबर १९९६ रोजी युती शासनाच्या काळात रक्कम रुपये ८७ कोट ४८ लाख रुपयांना मंजूरी घेऊन एकरूख उपसा सिंचन योजनेच्या कामाला सुरुवात झाली. परंतु २५ जानेवारी १९९८ रोजी स्व. आ. बाबासाहेब तानवडे यांचे अपघाती निधन झाले, नंतर सिद्धाराम म्हेत्रे हे आमदार झाले. सन १९९९ ते २०१५ पर्यंत या योजनेचा खर्च वाढत ही योजना ४१२ कोटी ८० लाखावर गेली. व सन २०२३ अखेर या योजनेवर २०५ कोटी ३१ लाख खर्च झाले असून या योजनेतील दर्गनहळ्ळी फाटयाची वितरण व्यवस्था पूर्ण करण्यासाठी २०७ कोटी ४९ लाखाची आवश्यकता आहे. सन २०२३-२४ मध्ये या योजनेची किरकोळ कामे करण्यासाठी रुपये ५० कोटी ची तरतूद करण्यात आली आहे.
आघाडी सरकारच्या काळात श्री. म्हेत्रे यांनी काही प्रमाणात निधी आणला परंतु दोन वेळा भूमिपूजन करुन सुद्धा व गृहराज्य मंत्री पद असून सुध्दा योजना पूर्ण होण्यास आवश्यक निधी मिळवता आला नाही. त्या पुढील काळात निधी अभावी सन २००६ पासून या योजनेचे काम बंद पडून सुधानांत प्रशासकीय मान्यतेमध्ये ही योजना अडकून पडली. सन २००९ साली सिद्रामप्पा पाटील आमदार झाले. सुधारीत प्रशासकीय मान्यतेसाठी प्रयत्न करूनही मान्यता मिळाली नाही. तदनंतर युती शासन सत्तेवर येऊन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. दिनांक ०६ सप्टेंबर २०१५ रोजी मुख्यमंत्री महोदयांना बोरी कुरनूर धरणावर मी स्वतः निमंत्रित करून या योजनेमुळे अक्कलकोट शहराचा व ५१ गावाचा पिण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मिटणार आहे, अक्कलकोट तालुक्यातील ५१ गावामधील १०११० हेक्टर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील १९ गावची ७२०० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे रे निर्देशनास आणून दिले व ही योजना अक्कलकोट व दक्षिण सोलापूरसाठी किती महत्वाची आहे हे मी त्यांना पटवून देण्यात यशस्वी झालो.
पुढे दिनांक २८ सप्टेंबर २०१५ रोजी मुख्यमंत्र्याच्या वर्षा निवासस्थानी भेट घेऊन या योजनेचा सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रस्ताव सादर करण्याचे आदेश घेऊन, फाईलचा पाठपुरावा चालू केलो, कृष्णा खोरे विकास महामंडळ, सोलापूर येथील कार्यालयात सुधारीत प्रशासकीय मान्यता परिपूर्ण प्रस्ताव चार महिन्यात तयार होऊन चिफ. इंजिनियर कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे यांना सादर करायला भाग पाडले. तिथे प्रस्ताव छाननी करून ५ महिने नंतर कार्यकारी संचालक कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे यांच्या कार्यालयात गेलो. त्या ठिकाणी संपूर्ण त्रुटी पूर्तता करून दोन महिन्या नंतर राज्य तांत्रिक सल्लागार समिती कार्यालय कोथरूड, पुणे येथे सादर केला. तत्कालीन राज्य तांत्रिक सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली तीन वेळा मिटिंग होऊन १४ महिन्यात परिपूर्ण प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला. मंत्रालयीन स्तरावर सदर प्रस्तावाची छाननी होऊन अंतिम मंजुरीचा परिपूर्ण प्रस्ताव आठ महिन्यात तयार होऊन दिनांक २२ एप्रिल २०१८ रोजी तत्कालीन अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगुंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली व्यय अग्रक्रम समितीची मिटिंग तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या उपस्थितीत, सुधारीत प्रशासकीय मान्यतेला मंजुरी घेऊन, ४८ कोटी रुपयाच्या खर्चाला मान्यता मिळवली, तदनंतर अधिक्षक अभियंता कृष्णा खोरे विकास महामंडळ, सोलापूर यांच्या मागे लागून जुन्या काँट्रॅक्टरला काम चालू करण्यास भाग पाडले. मा. दिलीपभाऊ सिद्धे यांना सोबत घेऊन साईटवर भेट दिली, काम जलदगतीने होण्यासाठी कॉंट्रॅक्टरला मशनरी वाढविण्यास भाग पाडले. सातत्याने वैयक्तिक साईटला भेटी देऊन सन २०२० मध्ये काम पूर्ण करून घेऊन या योजनेची टेस्टिंग (प्रथम चाचणी) प्रशासनाकडून घ्यायला भाग पाडले.
आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी यांना या योजनेचे आयते बटण दाबण्याचे भाग्य मिळाले, या संपूर्ण सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या प्रस्तावाचा पाठपुरावा तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख मालक यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः परिश्रम घेऊन केला असून या योजनेचा वास्तव प्रवास मी जनतेसमोर मांडत आहे. व माझ्याकडे मा. मुख्यमंत्री महोदयांचे आदेश व जलसंपदा मंत्री महेदयांचे प्रशासकीय स्तरावर चालू असलेल्या कार्यवाहीचे पत्र हे पुरावे म्हणून उपलब्ध आहेत. व मी ते पुरावे सोशल मिडीयावर वायरल केलो आहे. म्हणून एकरूख उपसा सिंचन योजनेचे अंतिम टप्याचे श्रेय आजी- माजी आमदारांनी घेऊ नये.
आपल्याकडे अंतिम टप्याला पाठपुरावा केल्याचे पुरावे उपलब्धअसल्यस ते जनतेला दाखवावे व मिडियावर वायरल करावे. अन्यथा फुकटचे श्रेय घेण्याचे प्रयत्न आमदार महोदयांनी करु नये. अन्यथा आपण श्रेय घेण्याचा प्रयत्न केल्यास आपला खोटारडेपणा जनते समोर उघड झाल्याशिवाय राहणार नाही, हे ही ध्यानात घ्यावे, हे पत्रकार परिषदेतून बाळासाहेब मोरे माजी विरोधी पक्षनेता पंचायत समिती अक्क्लकोट यांनी सांगितले. यावेळी आनंद तानावडे उपस्थित होते.